गुन्हेगारीमहाराष्ट्र

एटीएम मधील लोकांना फसवुन, अफरातफर करुन पैसे काढणारा आरोपी जेलबंद

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

एटीएम मधील लोकांना फसवुन, अफरातफर करुन पैसे काढणारा आरोपी जेलबंद

शिर्डी प्रतिनिधी :- दिनांक 16/01/2025 रोजी सायंकाळी 05.45 वाजेच्या सुमारास चंद्रभान लक्ष्मण वाणी वय 63 वर्षे धंदा-सेवा निवृत्त रा. नांदुर्खा खुर्द ता राहाता जिल्हा अहिल्यानगर हे पैसे काढण्यासाठी मैड हॉस्पीटल राहाता ता राहाता चे समोरील राहाता स्टेट बँकेचे ATM मध्ये गेले असता तेथील अनोळखी दोन इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे माझेकडील ATM कार्ड घेवुन हात चालाखी करुन त्यांचे कडील दुसरे स्टेट बँकेचे ATM कार्ड हे ATM मशीन मध्ये टाकुन चंद्रभान वाणी यांना ATM चा पीन टाकण्यास सांगुन त्यांचा ATM चा पीन पाहून घेवुन त्यांचे कडील दूसरे ATM कार्ड त्यांना देवून ते बाहेर गेल्यावर त्यांचे ATM कार्ड हे मशीन मध्ये टाकुन त्यांचे एकुण 22,000 रुपये काढुन घेवुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा रजि क्रमांक 43/2025 भा.न्या. संहिता कलम 318 (4) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्याकडेस होता. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाठ, पो.हे.काँ अशोक झिने, पोहेकों / श्रीकांत नरोडे होमगार्ड शेलार असे तपास करत असतांना दिनांक 02/03/2025 रोजी सायकांळी 06:00 वाजण्याचे सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे माहीती मिळाल्याने तेथील बराच स्टाफ गेला असता, त्याचे नावाची खात्री केली असता त्याचे नाव दिपक राजेंद्र सोनी वय 35 घयें स. 148 वार्ड नं. 11, गोवर्धन टाकी जवळ, सरणीमार्ग, उत्तरपुर मध्यप्रदेश हल्ली रा.301, संगमनगर वागसवेनिया भोपाळ राज्य मध्यप्रदेश असे असल्याचे समजले. सदर इसम उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने तसेच संशयीतरित्या हालचाली लक्षात आल्याने दोन पंचासमक्ष पोलीसांनी त्याची झडती घेतली असता सदर आरोपींचे अंगझडतीत एकुण 69 एटीएम वेगवेगळ्या बँकेंचे मिळून आले आहेत. तसंच दोन फेवीक्वीक मिळून आले असून त्याने एटीएमची अफरातफर करुन फसवणुक करुन पैसे काढत असल्याचे कबुल केले आहे तसेच सदर आरोपीने वरील गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यास दिनांक 02/03/2025 रोजी अटक करण्यात येवुन मा. न्यायालयाने  त्यास दिनांक 07/03/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी दिलेली असुन तपास सुरु आहे. सदर 69 एटीएम हे वेगवेगळ्या शहरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जाहिरात
जाहिरात

मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. वैभव कलुबमें तसेच शिडी उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. शिरीष वमने यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सफौ प्रभाकर शिरसाठ, पोहेकाँ अशोक झिने, पोहेकाँ श्रीकां नरोडे, पोना / विनोद गंभीरे, होमगार्ड शेलार यांनी गुन्हे उघडकीस आणला आहे



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

कोण नामदेव ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही;….राज्यात संतापाची लाट सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/QlHcN6C1w6Y?si=Wb-mritc0.

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

 

                     

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे