कृषीवार्ताक्रिडा व मनोरंजन

एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ‘अळंबी-प्रक्रिया’ व विविध विभागास भेट

एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ‘अळंबी-प्रक्रिया’ व विविध विभागास भेट

कोपरगाव, जि. अहिल्यानगर- नगर- श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील वनस्पीशास्त्र विभागातील एम.एस्सी.भाग १ च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच  म.फुले कृषी विद्यापीठातील ‘अळंबी-प्रक्रिया’ उद्योगास भेट दिली. त्यांतर्गत विद्यार्थ्यांनी राहुरी विद्यापीठातील अळंबी तंत्रज्ञान विभाग (Mushroom Technology Unit),बियाणे प्रक्रिया विभाग (Seed Processing Unit), जैविक खते व कीटकनाशक (Biofertilizer & Biopesticide Unit)विभागास भेट देवून माहिती घेतली.

जाहिरात

सदर भेटीमध्ये अळंबी प्रक्रियेबाबत गोदागिरी फार्मचे संचालक श्री. ऋषिकेश औताडे यांनी मशरूम /अळंबी लागवड कशी करावी त्याचबरोबर अळंबी बीज प्रक्रियेपासून वितरणापर्यंत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेली अळंबी उच्च दराने विकत घेण्याची हमी दिली. याबरोबर जैविक खत प्रकल्पाबाबत श्री. अभिजीत कोकरे यांनी, तर बीज प्रक्रियेबाबत श्री. ढगे यांनी, तर श्रीमती मनीषा नांगरे यांनी कीटकनाशक विभागाची माहिती दिली.

जाहिरात

या क्षेत्रभेटीसाठी मा. प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी परवानगी व मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात, “त्यांनी या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता जागृत होऊन नवीन उद्योग निर्मितीसाठी चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.” या क्षेत्रभेटीसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हंसराज मते, IQAC समन्वयक डॉ.निलेश मालपुरे व विभागातील इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.संकेत शिंदे, प्रा. योगेश खिलारी, प्रा.दिव्या निमसे आणि पदव्युत्तर वर्गाचे २३ विद्यार्थी विद्यार्थिनीं यांनी सहभाग नोंदविला



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

उत्तर भारत vs दक्षिण भारत?  महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक

https://youtu.be/SFmD_elyM9Y?si=4wdNIuXS2mkfHgED

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

 

                     

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे