गुन्हेगारी

शिर्डी हत्याकांडातील आरोपी विरुध्द मोक्का (MCOCA) कायद्यातंर्गत कारवाई.

शिर्डी हत्याकांडातील आरोपी विरुध्द मोक्का (MCOCA) कायद्यातंर्गत कारवाई.

शिडर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०३/०२/२०२५ रोजी पहाटेचे सुमारास मयत इसम नामे सुभाष साहेबराव घोडे, वय ४५ वर्षे, रा. करडोबानगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर हे त्यांचे मोटार सायकलवर श्री. साईबाबा संस्थान शिडी येथे ड्युटीला जात असतांना दोन आरोपीतांनी लुटमार करण्याचे उद्देशाने त्यांची मोटार सायकल अडवुन त्यांचा खुन केला होता.

जाहिरात

सदरबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६, ३०९(६), ३११, ३१२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा हा आरोपी नामे राजु उर्फ शाक्या अशोक माळी, वय २९ वर्षे, रा. गणेशवाडी, शिडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, व आरोपी नामे किरण ज्ञानदेव सदाफुले, वय २६ वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जाहिरात

नमुद दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना गुन्हयाचे तपास अधिकारी श्री. रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस स्टेशन यांनी सादर केला होता.त्याप्रमाणे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी शिर्डी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२५भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १२६, ३०९ (६), ३११, ३१२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ या गुन्हयातील आरोपी नामे १) राजु उर्फ शाक्या अशोक माळी, वय २९ वर्षे, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, २) किरण ज्ञानदेव सदाफुले, वय २६ वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम३ (१) (i), ३(२) व ३ (४) असे वाढीव कलम लावण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे सदरचे गुन्हयास दिनांक ०६/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलम लावलेले आहे



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

उत्तर भारत vs दक्षिण भारत?  महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक

https://youtu.be/SFmD_elyM9Y?si=4wdNIuXS2mkfHgED

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे