गुन्हेगारी

कोपरगावात बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई

कोपरगावात बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई

दिनांक 14/03/2025 रोजी होळी आणि धुलिवंदन दिनाच्या पार्श्वभुमीवर कोपरगाव शहरात दारु पिउन वाहन चालवण्यांनी व त्यामुळे अपघात करणाऱ्या वाहन चालकावर कार्यवाही करण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भगवान मथुरे, पोलिस हेड कॉन्सटेबल दिगंबर शेलार, पोलिस हेड कॉन्सटेबल एकनाथ लिंबोरे, होमगार्ड पुंडलिक जोरवर, होमगार्ड अमोल शिंदे, होमगार्ड गणेश लकारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अचानक वाहनांची तपासणी मोहीम राबवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारमासमोर रोडवर या ठिकाणी मध्य पिवुन (दारु पिवुन) वाहन चालवतांना मिळुन आलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांचे विरोधात मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये मा. न्यायालयात रिपोर्ट पाठविला असता, मा. न्यायमुर्ती श्री. बनसोड मॅडम, कोपरगाव न्यायालय यांनी वरील 08 ही इसमांना मध्यपान करुन वाहन चालवले या कृत्या बाबत दोषी ठरवुन प्रत्येकी 2000/-रु दंडाची शिक्षा ठोठावली आहे तसेच बेकायदेशीरपणे प्रवाशी वाहतुक करतांना मिळून आलेल्या वाहन चालका विरुध्द मोटार वाहन कायदा कलम 66 (1)/192 प्रमाणे मा. न्यायालयात खटला पाठविला असता, त्यास देखील मा. न्यायालयांनी दोषी ठरवून त्यास 3000/रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जाहिरात

तसेच दिनांक 14/03/2025 रोजी रहदारीस अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचे विरुध्द भारतीय न्याय संहीता कलम 285 अन्वये मा. न्यायालयात खटला पाठविला असता त्यास मा. न्यायालयांनी रहदारीस अडथळा निर्माण केला या कृत्या बाबत दोषी ठरवुन खटल्यामधील 02 इसमांना प्रत्येकी 500/-रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच भारतीय न्याय संहीता कायदा कलम 125 प्रमाणे पाठविलेल्या खटल्यामधील इसमास धोकादायक रित्या वाहन चालविल्या बाबत दोषी ठरवुन त्यास 1000/- रु दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

जाहिरात

या कार्यवाही बाबत मा.श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी व मा.श्री. भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोलिस हेड कॉन्सटेबल दिंगबर शेलार, पोलिस हेड कॉन्सटेबल एकनाथ लिंबोरे, पोलिस  कॉन्सटेबल समाधन वर्षे, होमगार्ड पुंडलिक जोरवर, होमगार्ड अमोल शिंदे, होमगार्ड गणेश लकारे यांचे चांगल्या कामगिरी बाबत कौतुक केले आहे



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

उत्तर भारत vs दक्षिण भारत?  महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक

https://youtu.be/SFmD_elyM9Y?si=4wdNIuXS2mkfHgED

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे