परभणीच्या अल्पवयीन पीडितेला न्याय द्या,लहुजी क्रांती मोर्चा संघटनेची निवेदनातून मागणी
परभणीच्या अल्पवयीन पीडितेला न्याय द्या,लहुजी क्रांती मोर्चा संघटनेची निवेदनातून मागणी
येवला प्रतिनिधी :- परभणी येथे एका दहावर्षीय अल्पवयीन मुलीवर काही समाजकंटकांनी अमली पदार्थाचे सेवन करून अमानुष अत्याचार केला आहे. या पीडितेस नशेची औषधे पाजून या नराधमांनी मूलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कृत्याचा महाराष्ट्रभर निषेध नोंदविण्यात येत आहे. येवला येथील लहुजी क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यात त्या अल्पवयीन पीडितेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. लहुजी क्रांती मोर्चाचे सुनील खैरनार, सागर पडवळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. रवि कांबळे, यश बंदरे, शिवम त्रिभुवन, सचिन खैरणार, अमोल खौरनार, विनोद खैरनार स्वाक्षऱ्या आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.आरोपींची नाकों टेस्ट करण्यात यावी, पीडितेच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे.असे निवेदनात म्हटले आहे


