महाराष्ट्र

आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव हेडगेवार यांची जयंती कोपरगावत साजरी

आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव हेडगेवार यांची जयंती कोपरगावत साजरी

कोपरगांव येथील नगरपरिषदेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे सांस्कृतिक वार्तापत्र विभागाचे वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची १३६ वी जयंती त्यांचे प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली आहे.या प्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके, स्वयंसेवक सागर बडदे, सांस्कृतिक वार्तापत्राचे प्रतिनिधी रविंद्र निकम, सहाय्यक ग्रंथपाल राजेंद्र शेलारमामा, मंगेश वायाळ, गणेश राक्षे आदींसह स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने शताब्दी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, स्वबोध, नागरी शिष्टाचार यासह विविध विषयांवर कार्यक्रम हाती घेतले जात आहे.स्वयंसेवक सागर बडदे यांनी, स्पर्धा परीक्षा, स्वबोध यावर मार्गदर्शन करत डॉ. केशव हेडगेवार यांची माहिती सांगितली.

जाहिरात

तर स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी स्पर्धेत टिकून यशस्वी होण्यासाठी निरंतर प्रयत्न महत्त्वाचे आहे. झाडाला पानगळ होवून नवीन पालवी येते.असा चैत्र पालवीचा ‘वसंतऋतू’ प्रेरणा देतो. असे सांगितले.याप्रसंगी विद्यार्थी यांना मनोगत व्यक्त केले. तर आभार सांस्कृतिक वार्तापत्र प्रतिनिधी रविंद्र निकम यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे