ब्रेकिंग

विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी कोपरगावकर मैदानात! जंतर-मंतरवरील आंदोलनाला ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेचा कडक पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी कोपरगावकर मैदानात! जंतर-मंतरवरील आंदोलनाला ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेचा कडक पाठिंबा

कोपरगाव, २२ जुलै २०२६:दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशातील विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी ‘परीक्षा सुधारणा आंदोलन’ अत्यंत तीव्रतेने सुरू आहे. या देशव्यापी आंदोलनाला ‘माझा गाव माझा अभिमान’ कोपरगाव या संघटनेच्या वतीने आणि कोपरगाव तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीने जाहीर आणि कडक पाठिंबा देण्यात येत आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने भारताचे माननीय राष्ट्रपती महोदय (भारत सरकार, नवी दिल्ली) यांना कोपरगावचे माननीय तहसीलदार साहेब आणि शिर्डीचे माननीय प्रांत साहेब यांच्यामार्फत एक अधिकृत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून, संपूर्ण शिक्षण व परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी तातडीने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेने या निवेदनाद्वारे केली आहे.या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या निवेदनाच्या प्रती माननीय पंतप्रधान (भारत सरकार), माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री (नवी दिल्ली), महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री (मुंबई), शिर्डी लोकसभा क्षेत्राचे माननीय खासदार साहेब आणि कोपरगाव विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार साहेब यांनाही माहिती व त्वरित कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचे हित हेच देशाचे हित आहे, त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.

ज्योती पतसंस्था

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे