महाराष्ट्र

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा परिषद, लातूरच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा परिषद, लातूरच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद स्थायी सभागृह, लातूर येथे दिनांक १५ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक मा सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा राहुल कुमार मीना, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा डी. टी. आंबेगावे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जिल्हापरिषद लातूर येथील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मराठवाड़ा अध्यक्ष विष्णु आष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा सचिव दिनेश गिरी यांनी आवाहन केले आहे.

जाहिरात
जाहिरात

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार, त्यांचे कुटुंब, लातूर शहर व परिसरातील गरजू कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा आपण लाभ घ्यावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे