महाराष्ट्र

२१व्या शतकातील सर्वांगीण विकास युवा क्रांती कारक विवेक कोल्हे– नारायण अग्रवाल

२१व्या शतकातील सर्वांगीण विकास युवा क्रांती कारक विवेक कोल्हे– नारायण अग्रवाल

अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगांव परिसर संपूर्ण देशाला सर्वं दिशांनी समप्रमाणात जोडणारा मध्यवर्ती महत्वाचा दुवा असल्याचे भान असल्याने कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब यांनी विसाव्या शतकात अहोरात्र जिवाचे रान करून या परिसरासाठी यशस्वी विकास मंदिराचे बिजा रोपण केल्यावर माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, विश्वस्त सुमित दादा कोल्हे यांनी कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब यांचे ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वस्व अर्पण करून शिक्षण, सहकार, आरोग्य, रोजगार, महिला कल्याण आर्थिक , उद्योग, सामाजिक उपक्रम क्षेत्रात केलेल्या कामाची दखल देश व राज्य पातळीवर विविध स्तरांवर घेतल्यानेच कोल्हे परिवारांला शतकापार पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

जाहिरात

कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब श्रीमती सिंधुमाई कोल्हे यांच्याकडून अद्वितीय संस्कारीत बाळकडू प्राशन केलेल्या विवेक भैय्या यांनी अल्पवयात आंतरराष्ट्रीय पातळीवरील इफको कृषी सहकारी खत आणि बिज उत्पादन कंपनीचे संचालक म्हणून गौरवास्पद कामगिरी बजावली, संजीवनी सहकारी साखर कारखान्यात विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित वापरातून साखर उत्पादन वाढ आणि साखर उत्पादन खर्चात विक्रमी बचतीचीसह विविध यशस्वी उपक्रम राबवून आगळीवेगळी किमया साधली,रोजगार निर्मिती व उद्योग प्रशिक्षणात कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या ग्रामीण विकासाची स्वप्न पुर्ती साकारली आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, साई संजीवनी बॅंकेतील कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी गौरविले आहे.
सर्वात. महत्वाचे म्हणजे अत्यंत डबघाईस आलेला गणेश सहकारी साखर कारखाना कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सुस्थितीत आणून हजारो नागरिक, शेतकरी व ग्रामीण भागातील उद्योगाला नवसंजीवनी दिली. कोल्हे परिवाराने गणेश सहकारी साखर कारखाना दोन्ही वेळा वाचविला हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे.नासिक विभागीय शिक्षक मतदार संघात अवघ्या १५ दिवसात एकाकी झुंज देवून सामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान पटकावले आहे.
आपल्या विवेकी संस्कारातून सहकारी संस्था मध्ये राजकारण हद्दपार करण्याच्या स्व.कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब आणि कर्मवीर स्व शंकररावजी काळे साहेब यांच्या गौरवास्पद आदर्श समझोता पॅटर्नची पुन: वृत्ती घडवून कोपरगांव तालुक्यातील सहकार व कोपरगांव विधानसभा बिनविरोध निवडणुका पार पाडण्यासाठी विकासातील मोठा अडथळा दूर करण्याची यशस्वी किमया घडविताना एकाही मताची हेराफेरी टाळल्याने राज्यात एक आदर्श परंपरा निर्माण केली आहे. हे फक्त कोल्हे कुटुंबिय घडवू शकतात याचा सार्थ अभिमान आम्हा कार्यकर्त्यांत आहे.आरोग्य क्षेत्रात प्राणघातसंक कोरोना साथीत कोल्हे परिवारातील मायलेकांना कोरोनाने जखडले असतांना केवळ संजीवनी उद्योग व शिक्षण समूहाचे बळावर लाखावरील जनतेचे प्राण वाचविले,रोजगार क्षेत्रात प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीतून विविध उद्योगांत हजारो तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिले.ग्रामीण महिला व पुरुष बचतगट, इफको सहकारी खत आणि बियाणे उत्पादन कंपनी, संजीवनी ग्रामीण उद्योग समूहाचे योगदानामुळेच संपूर्ण देशात लक्षावधी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे विक्रम घडत असतांना केवळ नि केवळ कोपरगांव तालुका अपवाद ठरला तो कोल्हे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांतील योगदानाने ही किमया साधली आहे.अशा संस्कारीत कोल्हे कुटुंबीयातील विवेक भैय्या कोल्हे *हम भी कुछ कम नहीं* या जिद्दीने जो संघर्ष करीत आहे. त्याची दखल निश्चितच घेऊन त्यांच्या भूषणावह कार्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याशिवाय इतिहासात कुठलाही पर्याय शिल्लक नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.अशा कर्तृत्ववान विवेक भैय्या कोल्हे यांच्या गौरवास्पद कामगिरीतून भावी काळात कोपरगांव तालुका भारताचा कॅलिफोर्निया म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल व जनशक्ती विवेक भैय्या कोल्हे यांना देवो ही प्रभु चरणी प्रार्थना!!!
जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव

 

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6

नगर मनमाड रोडवर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

https://youtu.be/-_WyxTHcthI?si=XdBcpGLMQKX6_-LR

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे