“कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीत सोरट नावाचे जुगार अडडयावर छापा टाकुन ४०,४२० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
“कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीत सोरट नावाचे जुगार अडडयावर छापा टाकुन ४०,४२० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने केली कारवाई
संपादक:- रवींद्र जगताप
मा.श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री वैभव कलुबमें, अपर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग, यांनी दिलेल्या आदेश व सुचनांनुसार पोलीस स्टेशन हददीत अवैद्यरित्या जुगार, सोरट धंदे करणारे लोकांवर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी अशा प्रकारे अवैद्य जुगार, सोरट धंदे करणारे इसमांवर कारवाई करणेसाठी वैयक्तिक पक्ष घातले असुन अशा प्रकारच्या गुन्हयांना आळा घालणेकरीता स्वतंत्र पोलीस तपास पथक नियुक्त केले आहे.

दिनांक 19/02/2024 रोजी दुपारी 3:45 वा सुमारास कोळपेवाडी येथे ग्रामपंचायत इमारतीचे पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये ता. कोपरगाव येथे इसम नामे मॉन्टी उर्फ मनोज दिलीप मधुरे वय 32वर्षे, रा. मुंदेलखुला येवला ता. येवला जि. नाशिक हा 40,520 रुपये त्यात रोख रककम व सोरट जुगाराचे साहित्य साधनासह सोरट नावाचा हार जितीचा जुगार पैसे लावुन खेळतांना व खेळविताना मिळून आला आहे. याबाबत पो को, अविनाश अशोक तमनर यांनी फिर्याद दिल्याने, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गु.र.नं. 45/2024 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास स.फो. गजानन वांढेकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा.श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा श्री वैभव कलुबमे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा.श्री शिरोष वमने सो उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदिप कोळी, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढॆकर, सुरेश गागरे, पो ना. विलास कोकाटे अविनाश तमनर, अंबादास वाघ, नेमणूक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीत अशा प्रकारे अवैद्य धंदे करणारे इसमांची माहीती घेऊन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले आहे.



