धार्मिक

काळे परिवाराच्या स्वामी सेवेचे प.पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचेकडून कौतुक

काळे परिवाराच्या स्वामी सेवेचे
प.पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचेकडून कौतुक
कोपरगाव वार्ताहर- आमदार आशुतोष काळे यांनी स्वामी सेवेचा वारसा पुढे चालवत ठेवला असून त्यांच्या रूपाने काळे कुटुंबाची तिसरी पिढी स्वामी सेवेचे कार्य करीत आहे. आहे. आम्ही कोळपेवाडी कारखाना कार्यस्थळावर गेल्या ४० वर्षांपासून अनेक नाम साप्ताह केले आहेत. मा.खा.स्व,कर्मवीर शंकररावजी काळे, स्व.सौ.सुशीलामाई काळे, माजी आमदार अशोकराव काळे यांनी स्वामी सेवा केली आहे. आणि आजही कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील श्री विष्णू मंदिरात श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामींची सेवा सुरु असल्याने सांगत प. पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी काळे कुटुंबाचे कौतुक केले.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील स्वामी समर्थ सेवेकरी संतोषभाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून कोपरगाव तालुक्यातील कारवाडी-शहा येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण आणि वास्तुशांती सोहळा शुक्रवार (दि.१५) रोजी प. पु. मोरेदादा यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ कथा, अखंड नामजप यज्ञ आणि श्री गुरुचरित्र पारायण व अन्नदान करण्यात आले.
या सोहळ्या प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले तसेच संत-महंतांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी बोलताना आ.आशुतोष काळे यांनी शहा-कारवाडी आणि कोपरगाव तालुका हा अतिशय धार्मिक परिसर असून आमचे काळे कुटुंबीय देखील धार्मिक आहे. कारखाना  कार्यस्थळावरील व परिसरातील नागरिकांना स्वामी सेवा करता यावी याकरिता प.पु.मोरेदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना केली आहे.केंद्र प्रमुख संतोषभाऊ जाधव हे प्रवचन सेवा देवून मोठे धार्मिक काम करीत आहे. कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र हे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील एक महत्त्वाचे आणि मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांतील हजारो भाविक या केंद्राशी जोडलेले आहेत येथील धार्मिक आणि प्रसन्न वातावरण पाहता यापुढेही भाविकांची संख्या अधिक वाढणार असल्याचे सांगितले.या प्रसंगी परमपूज्य गुरुवर्य श्री रमेशगिरीजी महाराज,परमपूज्य श्री महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशीकानंदजी महाराज, परमपूज्य श्री राघवेश्वरानंदगिरीजी महाराज,सुदर्शन न्यूजचे संस्थापक सुरेश चव्हाणके, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह संत-महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे