डॉ. कमलाकर गायकवाड यांचे साहित्यिक किरण नगरकर यांच्या साहित्यावरील पुस्तक प्रकाशन संपन्न
डॉ. कमलाकर गायकवाड यांचे साहित्यिक किरण नगरकर यांच्या साहित्यावरील पुस्तक प्रकाशन संपन्न
.
कोपरगाव: तालुक्यातील संशोधक मार्गदर्शक डॉ. कमलाकर गायकवाड यांचे किरण नगरकर यांच्या ‘साहित्य कृतीतील अंतर्दृष्टी साहित्य मूल्यांचा सखोल अभ्यास’ हे तिसरे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. डॉ.गायकवाड हे सध्या महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित समाजश्री प्रशांत दादा हिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नामपूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे इंग्रजी विभाग प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ .कमलाकर गायकवाड यांचे हे पुस्तक कायरेन पब्लिकेशन,पालवाल, हरियाणा यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकात किरण नगरकर यांची ओळख, त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या कादंबऱ्या, कथा व नाटके यावर आधारित ४० संशोधन लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. यातील काही लेख डॉ. संदीप खेडकर (रिसर्च गाईड, सोनई कॉलेज नेवासा), डॉ. स्मिता पाटील (रिसर्च गाइड नाशिक) आणि डॉ. विजय सोनगीरे (सहाय्यक प्राध्यापक, सेंट जॉन कॉलेज ऑफ हुम्यानीटीज अँड सायन्सेस, पालघर) यांनी सहलेखक म्हणून लिहिलेले आहेत. तसेच या पुस्तकाचे मनोगत डॉ. संदीप खेडकर सर यांनी लिहिलेले आहे.

डॉ. गायकवाड यांनी सदर पुस्तकात किरण नगरकर यांची लिखाण शैली, त्यांचे भारतीय इंग्रजी साहित्यामधील योगदान, विविध मध्यवर्ती कल्पना, सामाजिक, राजकीय व धार्मिक विषयावरील सांगोपांग चर्चा, वेगवेगळ्या साहित्य प्रकारामधून केलेली जनजागृती, धाडसी लिखाण इत्यादी बाबी सविस्तर नमूद केल्या आहेत.
हे पुस्तक संशोधक, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे डॉ. कमलाकर गायकवाड यांनी मनपुर्वक आभार मानले. हे पुस्तक फ्लिपकार्ट वर ऑनलाइन उपलब्ध असून याचा आय एस बी एन नंबर ९७८-९३-४९६८६-४६-५ इतका असून त्याचे मुल्य रु.५५९ इतके आहे.डॉ कमलाकर गायकवाड यांच्या साहित्य क्षेत्रातील लेखन कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी, आप्तेष्ट नातेवाईकांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक येथील अध्यक्ष डॉ. प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे, मोरे साहेब तसेच संस्थेचे ट्रस्टी व लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांनी डॉ.कमलाकर गायकवाड यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरूडे, उपप्राचार्य डॉ वाघ आणि सर्व सहकाऱ्यांनी डॉ गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा




