संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात
कोपरगाव :दि.५ जून २०२५ — संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल, सप्तर्षी मळा शाखा व जेऊर पाटोदा शाखा,कोपरगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूढ वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजन करून वृक्षारोपणाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थांचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,विश्वस्त विशाल झावरे,मुख्याध्यापक सचिन मोरे, स्थानिक नागरिक,पालक,विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद झाली. या दिवसाचे औचित्य साधून १९७३ मध्ये जगाने आपला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी हा विशेष दिवस साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन एका अर्थपूर्ण वृक्षारोपणाच्या उपक्रमासह साजरा करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनात वृक्ष लागवडीचे महत्त्व ओळखून शाळेने या हरित उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे,शिक्षिका मोनिका नन्नावरे,संगीता गाडे व नेटी डीसोजा यांनी विद्यार्थ्यांना “आपले पर्यावरण वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लहान वयातच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास भविष्य अधिक सुरक्षित होईल.”असे सांगत पर्यावरणाचे महत्व पटवून दिले व इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.जानवी पणीकर हिने जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व शाळेच्या विज्ञान शिक्षिका अनिता खरात यांनी वृक्ष लागवड कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने मोठ्या उत्साहाने बेल, चिंच, लिंब व जांभळाच्या झाडांचे शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळ किमान एक वृक्ष लावण्यास सांगितले. हा सहयोगी प्रयत्न शाश्वत वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होऊन शाळेने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी चेतना जागृत

करण्यासाठी त्यांचे समर्पण दाखवून दिले. या उपक्रमाने केवळ त्यांचे समर्पणच दाखवले नाही तर हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी वैयक्तिक कृतींच्या महत्त्वावरही भर दिला. शाळेतील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर उचललेली छोटी पावले एकत्रितपणे पर्यावरणावर महत्त्वपूर्ण सकारात्मक प्रभाव कसा निर्माण करू शकतात याचे प्रशंसनीय उदाहरण मांडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांतून शाळा सामाजिक बांधिलकी जपत राहील, असा विश्वास पालकांकडून व्यक्त करण्यात आला.
वृक्षारोपण करताना शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा
https://youtu.be/K9XClXuj8Dw?si=tJA1YLL4TkxtkerI