अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या पिकांचे व शेतमालाच्या मोठ्या प्रमाणातील नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी
अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या पिकांचे व शेतमालाच्या मोठ्या प्रमाणातील नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य सतत धार व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची ऊस फळबागा व हंगामी पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानी इतक्या प्रचंड आहेत की शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे या अतिवृष्टीमुळे कांदा सोयाबीन मका टोमॅटो तसेच इतर हंगामी व भाजीपाल्यांच्या पिकांना मोठे नुकसान झाले आहे तरी या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे एडवोकेट संदीप वर्पे कार्याध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनावर बापू रांधवणे तानाजी जाधव दिलीप लासुरे ऍडव्होकेट रमेश गव्हाणे सुरेश असणे सुनील वर्पे निखिल थोरात आदींच्या सह्या आहेत