महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची गुरूवारी जाहीर सभा
महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची गुरूवारी जाहीर सभा
कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा गुरुवार (दि.१४) रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.


कोपरगाव विधानसभा मतदार संघात आ. आशुतोष काळे यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आ.आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ. आशुतोष काळे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या जोशात प्रचार करीत आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील बहुतांश रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. मतदार संघातील जनतेशी नेहमी संपर्कात राहणारा व जनतेचे प्रश्न आणि अडी-अडचणी सोडवून कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. या कामी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मोलाची साथ व सहकार्य मिळाले असून आपल्या शिलेदाराच्या प्रचारासाठी ते स्वत: गुरुवार (दि.१४) रोजी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी महायुतीतील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.


