
सामाजिक कार्यकर्त्याच्या उपोषणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवकांनी भेट दिली.
शिट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही भूमिगत गटारीचे काम दर्जेदार करून घ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा नगराध्यक्षांना उपरोधिक सल्ला
कोपरगाव :- कोपरगाव शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी आ.आशुतोष काळे यांनी २२३ कोटी निधी दिला असून या भूमिगत गटार योजनेचे काम सुरु झाले आहे मात्र सदरचे काम हे निकृष्ठ दर्जाचे व इस्टीमेटप्रमाणे होत नसल्यामुळे बाबतच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते करीत असून त्यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देवून खरी तशीच परिस्थिती आहे का? याची शहानिशा करून काम गुणवत्तापूर्ण करून घेणे आवश्यक आहे. फक्त भूमिगत गटारीचे काम दर्जेदार झाले पाहिजे याकडे गांभीर्याने लक्ष द्या शिट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना दिला आहे.

कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भूमिगत गटारीचे काम इस्टीमेटप्रमाणे व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.या आमरण उपोषणाला कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देवून उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले कोपरगांव शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी आ.आशुतोष काळे साहेब यांनी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करावा. शासनाचे पैसे वाया जावू नये तसेच काम गुणवत्तापूर्ण होणे करिता तातडीने कार्यवाही करावी कोपरगांव शहरात रखडलेली विविध विकास कामे तातडीने सुरु करावी व उपोषणकर्त्यांचे शंकांचे निरसन करून उपोषण मागे घेण्याची विनंती करावी अशा विविध मागण्यां संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला याप्रसंगी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे म्हणाले की, भूमिगत गटारींसाठी आ.आशुतोष काळेंच्या माध्यमातून शहराला प्रथमच २३२ कोटींचा एवढा मोठा निधी आलेला असून हा प्रकल्प आ.आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे काम उच्च दर्जाचे व्हावे अशी त्यांची इच्छा असली तरी हि मानसिकता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष किंवा इंजिनिअर यांची असणे अत्यंत गरजेचे आहे. एवढा मोठा प्रकल्प शहरात होत असतांना तो व्यवस्थित पूर्ण व्हायला पाहिजे. इस्टीमेटप्रमाणे भूमिगत गटारींची कामे व्हायलाच हवी. हि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी,नगरसेवक आणि नागरिकांची मागणी आहे. पालिका प्रशासनाला जर हे काम झेपत नसेल तर हे काम एमजीपीकडे द्यावे. आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नगरसेवक विकास करण्यासाठी सक्षम असून हे काम आम्ही एमजीपी कडून चांगल्या दर्जाचे करून घेऊ.अशाच पद्धतीने मागच्या काळात ४२ कोटींच्या पाणी योजनेचे काय झाले त्याचा अजून पर्यंत उलगडा झालेला नाही. अशा मोठ्या योजनांना निधी आणूनही कोपरगावकरांच्या अडचणी सुटणार नसेल काय उपयोग. आम्ही छोटे चेंबर मागणी करतोय पण ते होत नाही. नगराध्यक्षांनी ठेकेदाराला सांगितले आहे की, चेंबरचे काम बंद करा. हि गटारीच्या कामाची कोणती पद्धत आहे. तुमचे आणि त्या ठेकेदाराचे काय असेल ते नंतर पहा अगोदर शहर विकासाकडे लक्ष द्या आणि नागरिकांना त्रास होईल असं काही करू नका असे सांगत हनुमाननगर भागामध्ये एक व्यक्ती चेंबर मध्ये पडून मृत झाल्याची आठवण करून दिली. आज जरी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले असले तरी यापुढे कोपरगाव नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्षांनी जबाबदारी घेवून खबरदारी घ्यावी जेणेकरून भविष्यात असे उपोषणाची वेळ सामाजिक कार्यकर्त्यांवर येणार नाही असा सल्ला दिला.विजय त्रिभुवन यांनी सांगितले की, विकासकामांसाठी सहजपणे निधी मिळत नाही निधी मिळविण्यासाठी अथकपणे पाठपुरावा करावा लागतो. त्या पाठपुराव्यातून भूमिगत गटार योजनेसाठी २२३ कोटी निधी मिळाला आहे. कामाची निविदा कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आधी निघाली होती व निवडणूक सुरु असतांना गटारीच्या कामास सुरुवात झाली असली तरी उपोषण कर्त्यांच्या मागणीप्रमाणे काम सुरु आहे की नाही याची मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करावी. तसेच नगराध्यक्षांनी देखील इस्टीमेटप्रमाणे काम होते किंवा नाही यासाठी लक्ष ठेवावे. नुसत्या शिट्ट्या मारून कोपरगाव शहराचा विकास होणार नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले तर तुम्ही काम करा. सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करण्याची वेळ का आली? नगराध्यक्षांकडून उपोषणकर्त्यांची साधी विचारपूस झाली नाही यावरून सामाजिक कार्यकर्ते उपोषण करून मेले तरी तुम्हाला काहीच देण घेण नसल्याचे दिसून येते. तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिले याचे भान ठेवा आणि शहराचा विकास करा. तुम्ही नुसत्या शिट्ट्या वाजवत बसले तर कोपरगाव शहराची पिपाणी वाजायला वेळ लागणार नाही असे विजय त्रिभुवन यांनी सांगत चिंता व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून
https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I


