कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कोल्हे कुटुंबियांच्या त्यागातून कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी क्रांती — जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कोल्हे कुटुंबियांच्या त्यागातून कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी क्रांती — जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे विक्रमी वेगाला कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब व त्यांच्या खांद्याला खांदा लावून साहेबांच्या नेतृत्वाखाली बिपिन दादा कोल्हे कोल्हे परिवारांच्या तीन पिढ्यांनी चाळीस वर्षे वीज,पाणी, शेतीपूरक उद्योगासह शैक्षणिक प्रकल्प निर्मिती,आर्थिक दृष्ट्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना, कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहत, व विविध सहकारी कृषी प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक प्रकल्प राबविण्यातून शेतकऱ्यांना शेती मालास योग्य भाव रोजगार उपलब्ध करून देण्यात बिपिन दादा यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी महिला बचत गटांची निर्मितीतून प्रत्येक शेतकरी नव्हे तर सामान्य नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करत खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देवून या तालुक्यात कर्ज बाजाराची एकही आत्महत्या घडू दिली नाही. याकरिता त्यांनी श्रेयाचा डांगोरा पिटला नाही.

बिपिन दादा यांनी तालुक्यातील युवकांना संघटित करून कोपरगांवतालुक्यातील कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी डावा-उजव्या कालव्याकरिता यावेळी सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना मदतीने यशस्वी लढे उभारले एवढेच नव्हे तर ह्या कालव्यांचे दुरुस्ती व गाळ काढणे खोलीकरण करणे यासाठी सर्वस्व पणाला लावले यादरम्यान त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संघर्षात त्यांना कायम राजकीय संकटात अनेक वेळा खूप त्रास सहन करावा लागला.

कोपरगांव तालुका शहर आणि तालुका परिसरात महापूर, विविध साथी प्रकोप, नैसर्गिक, मानवीसंकटात बिपीन दादांनी हजारो नागरिकांचे स्वबळावर प्राण वाचविले यावेळी त्यांच्या जीवावर बेतले परंतु त्यांनी हार मानली नाही. कोपरगांव शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई काळात अनेक वेळा अहोरात्र स्वतः राबून या समस्यातून नागरिकांना वाचविले सगळ्यात महत्वाचे म्हणजे सध्याच्या कोपरगांव शहर पाणीपुरवठा योजना केंद्र व राज्य शासनाच्या कडून मंजूर करण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकले नाही याकरिता सर्वस्व पणाला लावले.तसेच संजीवनी उद्योग समूहाचे वतीने स्वखर्च करून हे प्रकल्प यशस्वीपणे राबविले.कोल्हे परिवारातील तीन पिढ्यांना या संघर्षात केवळ जनहितार्थ जीवघेण्या राजकीय खेळीतून कुटुंबियांना सतत अपयशांचा सामना करावा लागतो आहे. परंतु कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बिपिन दादा, नितीन दादा, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब , अमित दादा, विवेक भैय्या यांची ह्या व्रजमुठीने फक्त जनहितार्थ अनेक वर्षांत विविध प्रशिक्षण केंद्रे, रोजगार मेळाव्याचे आयोजनातून स्थानिक ते जागतिक पातळीवर विक्रमी स्वरूपात लाखों युवक युवतींना कायमस्वरूपी रोजगार मिळवून मिळवून दिले व मिळवून देत आहे याचबरोबर बिपीन दादा यांनी आपल्या वाढदिवशी कोट्यवधी रुपये उधळण्या ऐवजी कोपरगांव तालुका व शहर परिसरात प्रत्येक विद्यार्थ्याला जागेवर जाऊन शालेय साहित्य कपडे यांच्या यशस्वी वाटपांची परंपरा आजही यशस्वीपणे राबविली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील सर्व धार्मिक सोहळे, सामाजिक, धार्मिक मंदिर उभारणीसह त्या परिसरातील वारकरी संप्रदायाने, युवक मंडळे यांच्या कार्यक्रमांना सतत मदतीचा लाभ दिला यांमध्ये गेल्या ३३ वर संत कैकाडी महाराज मनमाड ते पंढरपूर पायी दिंडीच्या कोपरगांव दरवर्षी मुक्कामी वेळेत कोल्हे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानली. अशा कोल्हे परिवारास भावी दिर्घायुष्य कायमस्वरूपी सर्वोत्तम सुखसमृद्धीचे सुखदायक आरोग्यदायी जावून त्यांच्या हातून अशाचप्रकारे विक्रमी सेवा घडविण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा


