संवत्सर येथील पंडित भारुड सर यांना डॉक्युमेंटरी निर्माते पुरस्कार २०२५ प्रदान

संवत्सर येथील पंडित भारुड सर यांना डॉक्युमेंटरी निर्माते पुरस्कार २०२५ प्रदान
कोपरगाव:कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्रोडक्शन व कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके जयंती निमित्ताने सन्मान कलाव़ंताचा पुरस्कार २०२५ संवत्सर येथील लेखक, साहित्यिक , पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,व डॉक्युमेंटरी फिल्म निर्माते पंडित भारुड सर यांना नुकताच मराठी अभिनेत्री(देव माणूस सिरीयल अभिनेत्री) पुष्पा चौधरी, कमल फिल्मचे अध्यक्ष सुनिल मोंढे सर, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, साहित्यिक सुभाष सोनवणे, गंगाधर कदम सर यांच्या हस्ते शिर्डी येथील साई एस के पॅलेस येथे “डॉक्युमेंटरी निर्माते पुरस्कार २०२५ प्रदान” करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलावंताना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके जयंती निमित्ताने सन्मानचिन्ह,मेडल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पंडित भारूड सर यांनी गंडतोडे, लाव्हा, क्रांतिसूर्या, प्रिंटेड सर्किट बोर्ड,आदि पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.त्याचप्रमाणे त्यांनी मराठी गीत,आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म विजयी गाथा निर्मीती केलेलीं असुन त्यातील चरित्र लेखन, गाणें, पोवाडे भारुड यांनी लिहिलेले आहेत . त्यांच्या साहित्य कलाकृतीस व डॉक्युमेंटरी फिल्म यांस अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलता बिपीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक दादा कोल्हे त्याचप्रमाणे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन दादा कोल्हे, तसेच संजीवनी विद्यापीठाचे अमित दादा कोल्हे, प्राचार्य मिरीकर , नानासाहेब कोल्हे, नानासाहेब लोंढे तसेच डॉ. गोवर्धन हुसळे, अँड भास्करराव गंगावणे, डॉ. बी.एस आगरकर , सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव बापू परजणे, बापूसाहेब बारहाते आदि ग्रामस्थांनी व सर्व स्तरातून भारुड यांचे अभिनंदन केले जात आहे.




