शिवमहापुराण कथेसाठी कोपरगावातून जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेनेकडून अतिरिक्त बसेसची मागणी, बस आगार प्रमुखांना दिलेले निवेदन
शिवमहापुराण कथेसाठी कोपरगावातून जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेनेकडून अतिरिक्त बसेसची मागणी, बस आगार प्रमुखांना दिलेले निवेदन
कोपरगाव शहर शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतिने कोपरगाव आगार प्रमुखाला शिवमहापुराण कथेसाठी कोपरगावातून जाणाऱ्या भाविकांसाठी कोपरगाव बस स्थानकातुन अतिरिक्त बसेसची मागणी, बस आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली
या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि प. पु. प्रदिपजी मिश्रा
यांच्या अमृतवाणीतून श्री शिवमहापुराण कथा
गुरुवार दिनांक 26 जून ते बुधवार 2 जुलै 2025
दुपारी 1 ते दु ४ पर्यंत लाडगाव चौफुली वैजापूर शहर संभाजीनगर येथे चालु राहिल या प्रसंगी कोपरगाव बस डेपो मॅनेजर बनकर साहेब यांना वैजापूर येथील शिव महापुराण कथेसाठी 10 व 11 व 12 टाइमिंग मध्ये जास्तीत जास्त बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली यासाठी शिवसेना शहर व युवा सेनेचे वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर शिवसेना कोपरगाव शहर प्रमुख अक्षय जाधव उपशहर प्रमुख निलेश पवार तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड गणेश जावरे विशाल सोनवणे वेदांत हिंगमिरे विनोद गलांडे सुनिल साळुंखे शंकर मोरे वैभव कुऱ्हाडे कृष्णा कडलग शुभम वायखिंडे यांच्या सह्या असुन सदर पदाधिकारी व शिवसैनिक नागरीक उपस्थित होते





