सामाजिक

प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात लढणार्या माता सावित्रीमाई फुलेंचा आदर्श महिलांना घ्यावा- गौतमराव बनसोडे

 

प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात लढणार्या माता सावित्रीमाई फुलेंचा आदर्श महिलांना घ्यावा- गौतमराव बनसोडे 

कोपरगाव प्रतिनिधी :- देशात गुलामीची बंधने अस्पृश्य समाजा बरोबर महिलांना देखील होती.अनेक वर्षे महिला गुलामीचे जीवन जगत होती.महात्मा फुले,डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथंग प्रयत्नातुन महिलांना गुलामीतुन बाहेर काढले.माता सावित्रीबाई फुले यांनी जो लढा लढला तो क्रांतीकारी लढा होता.या लढ्यामुळे महिलांची उन्नती झाली.महिलांच्या उन्नती मुळे घर सुखी झाले.घरामुळे समाज सुधारला, समाज सुधारल्या मुळे देश राज्य सुधारले. असे महान कार्य सावित्रिबाई फुले यांच्या मुळे झाले आहे.आजच्या या युगातही प्रस्थापित पुन्हा डोके वर काढत आहे.प्रत्येक महिलांना क्रांती ज्योती सावित्रिबाई फुले यांचे पुस्तक वाचले पाहिजे.प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात लढणार्या माता सावित्रीमाई फुलेंचा आदर्श महिलांना घ्यावा असे प्रतिपादन घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी आज १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने केले आहे.घटनाकार मैत्री संघाच्या वतिने सावित्रिमाता फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे