कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव येथे गणवेश व शालेय साहित्य वाटप
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव येथे गणवेश व शालेय साहित्य वाटप
कोपरगाव:- कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव येथे गणवेश व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला.याप्रसंगी सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. रमेश कोठारी, सुप्रसिद्ध बिल्डर मा. प्रसाद नाईक व इतर मान्यवरांच्या देणगीतून शालेय साहित्य वाटप झाले..
रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार मा. पदमाकांत कुदळे अध्यक्ष स्थानी होते…यावेळी मा. प्रसाद नाईक, डॉ. विलास आचारी, सौ. किरणभाभी कोठारी, मा. पद्माकानतजी कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात भक्तीगीत सादर करून रसिकांची मनं जिंकली.यावेळी कार्याध्यक्ष विजय जी बंब, सचिव योगाचार्य उत्तमभाई शहा,डॉ. चिंतन कोठारी, नाईक कुटुंबीय, जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्ष रजनीताई गुजराथी, अनेक सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक व सर्वं स्टाफ हजर होते.




