महाराष्ट्र

सरकारकडून कोपरगावकरांना नमो उद्यानाचे खास गिफ्ट, स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार

सरकारकडून कोपरगावकरांना नमो उद्यानाचे खास गिफ्ट, स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव नगरपरिषदेला राज्य सरकारकडून विशेष भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने कोपरगाव शहरासाठी नमो उद्यान उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कोपरगाव शहरात नागरिकांसाठी आधुनिक सुविधा असलेले सुंदर उद्यान उभारले जाणार असून, नागरिकांच्या आरोग्य आणि मनोरंजनासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.
जाहिरात
नरेंद्र मोदी हे आज जगभरात विश्वनेते म्हणून ओळखले जातात. भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा अधिक सक्षम आणि प्रभावी बनली आहे. अशा महान नेत्याच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावकरांना हे अनोखे गिफ्ट मिळणे हा शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे.
जाहिरात
जाहिरात
या विशेष उपक्रमाबद्दल नागरिकांच्या वतीने माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, या उद्यानामुळे शहराचे सौंदर्य वाढेल, नागरिकांना सकस आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल.कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी असे निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नमो उद्यान कोपरगावचे नवे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे