महाराष्ट्रसामाजिक

आतंरराष्ट्रीय ब्रँड अँण्ड लीडर अवॉर्डने कोपरगावचे साबळे नवी दिल्ली येथे सन्मानित

आतंरराष्ट्रीय ब्रँड अँण्ड लीडर अवॉर्डने कोपरगावचे साबळे नवी दिल्ली येथे सन्मानित

कोपरगाव – राष्टीय ग्रामीण व शहरी संगणक साक्षरता मिशन या आतंरराष्ट्रीय संस्थेतर्फे कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम रामनाथ साबळे यांचा नुकताच आंतरराष्ट्रीय ब्रँड अँण्ड लीडर अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे.नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे परंतु घरची परिस्थिती हलकीची असताना देखील आपल्या स्वतःच्या जिद्दीवरून हिमतीवर छोटा-मोठा काम धंदा करत आपले शिक्षण पूर्ण करत २००५ साली समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना उच्च प्रतीचे व्यावसायिक शिक्षण मिळावे या उद्देशाने कोपरगावात ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची मान्यता घेत अनेक छोटे-मोठे व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करत अनेक मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षणासोबतच मानसिक पाठबळ देत अनेक मुला-मुलींची भवितव्य उज्वल केले असून आज रोजी संस्थेचे हजारों विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून अनेकांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे तर अनेक विद्यार्थी परदेशात नोकरीस आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे या उद्देशाने तालुक्यातील कासली येथे स्थापन केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून देखील अनेक गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींना उच्च प्रतीचे शिक्षण अत्यंत माफक फी मध्ये मिळत आहे.

तसेच कोरोना सारख्या जागतिक महामारीत देखील साबळे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत कोरोना जनजागृती करत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले त्यासोबतच कोरोनामध्ये अनेक गरजूना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. सामान्य कुटुंबातील साबळे यांना या आदी देखील आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे याच त्यांचा बहुमूल्य कार्याची दखल घेत देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे रविवार दि १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मयूर विहार येथील आय आय डी एल या हॉटेल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्टीय ग्रामीण व शहरी संगणक साक्षरता मिशन या आतंरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष सुनिलकुमार,अखिल भारतीय शास्त्रीय महासभेचे अध्यक्ष अश्विनीसिंह ठाकूर, चित्रपट अभिनेत्री ट्विंकल कपूर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांना आतंरराष्ट्रीय ब्रँड अँण्ड लिडर अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे