महाराष्ट्र

सम्यक फाउंडेशन संविधानाचे सामूहिक वाचन करून भीम जयंती व फुले जयंती साजरी करणार

सम्यक फाउंडेशन संविधानाचे सामूहिक वाचन करून भीम जयंती व फुले जयंती साजरी करणार

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी= 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिल भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती संविधानाचे सामुहीक वाचन करून सम्यक फाउंडेशन साजरी करणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गीत गायन व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगितले. संविधान घराघरात पोहोचावे, संविधानाचे वाचन होऊन त्याचा अंगीकार प्रत्येक भारतीयांनी केला पाहिजे तर आणि तरच सक्षम सुसंस्कृत भारतीय समाज निर्माण होईल. म्हणून सामूहिक संविधान वाचन दिनाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे