महाराष्ट्र

संत गाडगेबाबा भानू प्रभाकार सेवा प्रतिष्ठान संगमनेर मार्फत सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट 

संत गाडगेबाबा भानू प्रभाकार सेवा प्रतिष्ठान संगमनेर मार्फत सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट 

कोपरगाव दिनांक : ” माजी शिक्षक मा. चं. का. देशमुख सर यांचे सातत्यपूर्ण समाजकार्य आणि निस्पृह सेवा सध्याच्या व्यावहारिक जगात एक आदर्श असा वस्तुपाठ आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे ‘गाव आणि गावातील लोकांची मने स्वच्छ करा’ हा संदेश आपल्या कृतीतून गेली अनेक वर्ष साकार करण्यासाठी धडपडणारे देशमुख सर सद्यस्थितीतील गाडगेबाबांचे एक सच्चे अनुयायी आणि कर्ते समाजसुधारकच  होत,” असे प्रतिपादन मा. प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी येथे केले. संत गाडगेबाबा भानू प्रभाकार सेवा प्रतिष्ठान संगमनेर या संस्थेच्या माध्यमातून  समाजसेवक मा. चं. का. देशमुख यांच्या वतीने स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजना व राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी स्वयंसेवकांना ग्रंथ वाटप करण्यात आले त्याप्रसंगी देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.

जाहिरात

यावेळी 45 स्वयंसेवकांना तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला 05 असे एकूण 50 ग्रंथ भेट देण्यात आले. याप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. के. के. देशमुख,  सोमैया महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे तसेच आंबरे पाटील विद्यालय गणोरे येथील योगा प्रेमी अध्यापक कैलास कानवडे  यांची विशेष उपस्थिती होती.

जाहिरात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “विद्यार्थ्यांना विनामूल्य ग्रंथ भेट देणारा हा एक आगळावेगळा आणि सर्वांगसुंदर असा कार्यक्रम संगमनेर येथील व्रतस्थ समाजसेवक मा. चं. का. देशमुख सर यांनी घडवून आणला, ही अत्यंत आनंददायी घटना आहे. वाचन-संस्कृती लोप पावत चाललेल्या आजच्या व्यावसायिक युगामध्ये विनामूल्य ग्रंथ वाटप आणि निस्पृह समाजसेवा नक्कीच प्रेरणादायी आहे.”

जाहिरात

याप्रसंगी मा. कैलास कानवडे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन आणि योगाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथी परिचय वाङमय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी करून दिला.  रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी उपस्थित आमचे आभार मानले तर डॉ. संजय दवंगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. किरण सोळसे, श्री. रोहित लकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

उत्तर भारत vs दक्षिण भारत?  महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक

https://youtu.be/SFmD_elyM9Y?si=4wdNIuXS2mkfHgED

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे