सोमैया विद्या मंदीर लक्ष्मीवाडी शाळेचे जिल्हा क्रीडा स्पर्धेत सुयश
सोमैया विद्या मंदीर लक्ष्मीवाडी शाळेचे जिल्हा क्रीडा स्पर्धेत सुयश
कोपरगाव :- जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, सोमैया स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई व सोमैया विद्यामंदिर,लक्ष्मीवाडी आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्कॉश स्पर्धा सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे दिनांक 11 व 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत पार पडल्या. मुख्याध्यापक श्री.मारुती गहिनीनाथ धायताडक यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.
सदर स्पर्धेत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे113 खेळाडू सहभागी झाले होते. 14,17,19 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात या स्पर्धा पार पडल्या.
14 वर्षाखालील मुले
1 कोळसे साई ज्ञानवर्धिनी ,गुहा
2 रुपवते प्रज्योत, सोमैया लक्ष्मीवाडी
3कोंढार आयुष, दि. ग.सराफ, संगमनेर
4चव्हाण विवेक सोमैया ,लक्ष्मीवाडी
5जगदाळे अमेय सावित्रीबाई ,राहुरी
14 वर्षाखालील मुली
1 सायली माने सोमैया लक्ष्मीवाडी
2 साबळे समृद्धी लक्ष्मीवाडी
3 साबळे श्रद्धा सोमैया लक्ष्मीवाडी
4 साबळे सिध्दी सोमैया लक्ष्मीवाडी
5 कुमार आयुषिका समता कोकमठाण
17 वर्षाखालील मुले
1 जाधव यश ज्ञानवर्धिनी ,गुहा
2 जबुंरकर प्रणित ,दि.ग.सराफ, संगमनेर
3 थोरात आदित्य सोमैया लक्ष्मीवाडी
4 पठारे गौरव सावित्रीबाई ,राहुरी
5 सोनवणे सार्थक शारदा, कोपरगाव
17 वर्षाखालील मुली
1 शेलार समृद्धी ज्ञानवर्धिनी ,गुहा
2 शेलार गौरी ज्ञानवर्धिनी, गुहा
3 शेख खतीजा सोमैया लक्ष्मीवाडी
4गायकवाड संबोधी दि.ग.सराफ,संगमनेर
5 ननवरे मृणाल सावित्रीबाई फुले, राहुरी
19 वर्षाखालील मुले
1पोंदे सोहम तक्षज्ञ आरडगाव
2 कस्तुरे लोकेश आत्मा मालिक, कोकमठाण
3होनकळस पार्थ समता कोकमठाण
4 बागूल सुस्मित सावित्रीबाई फुले ,राहुरी
5 आढाव शारदा,कोपरगाव
19 वर्षाखालील मुली
1चौरसिया ऐश्वर्या राहुरी कॉलेज
2 शेख सिमरन सावित्रीबाई फुले, राहुरी
3लांबे निकिता। राहुरी कॉलेज
4 ताकटे श्रेया सावित्रीबाई फुले, राहुरी
5 पवार समीक्षा आत्मा मालिक, कोकमठाण
सन्मानीय समीर सोमैया यांच्या दूरदृष्टीने,लक्ष्मीवाडी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाहिले स्कॉश कोर्ट ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध करून दिले आहे क्रीडा अकादमीचे काम अंतिम टप्प्यात आहे बॅडमिंटनचे चार कोर्ट, क्रिकेटचे भव्य मैदान, स्क्वॅश कोर्ट ,400 मीटर रानिंग ट्रॅक चे काम अंतिम टप्प्यात आहे.ग्रामीण भागातून देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण व्हावेत या हेतूने सन्मानीय समीर सोमैया यांनी या अकादमीची निर्मिती केलीआहे. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे..स्पर्धेच्या आयोजनात अकादमीचे प्रमुख एझाझ सर,आदित्य सर, जी. बी. एल. डायरेक्टर श्री. सुहास गोडगे, जिल्हा क्रीडाधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे, विशाल गर्जे,अक्षत सर,अहिल्यानगर स्कॉश संघटनेचे सचिव घनश्याम सानप यांचे सहकार्य लाभले मुख्याध्यापक श्री.मारुती धायतडक सर यांच्या उत्साही नेतृत्वाखाली.स्पर्धेचे व्यवस्थापन क्रीडा शिक्षक श्री.अमोलिक संजय व राहूल पवार यांनी केले.




