‘डॉ. कमलाकर गायकवाड यांना राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५ प्रदान’
‘डॉ. कमलाकर गायकवाड यांना राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५ प्रदान’
कौपरगाव: तालुक्यातील संशोधक मार्गदर्शक व सध्या महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नामपूर, ता. बागलाण, जि. नाशिक येथील इंग्रजी विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक तसेच डॉ. कमलाकर बाबुराव गायकवाड यांना साहित्य व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार भारत सेवा सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमार्फत, व्हेयिल फाउंडेशन, बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नीती आयोग, भारत सरकार यांच्या शिफारशी वरून त्यांना प्रदान करण्यात आला आहे.


या उल्लेखनीय पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे, इंग्रजी विभागातील प्राध्यापक वर्ग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवारा कडूनही त्यांचे मन:पूर्वक कौतुक करण्यात आले आहे.



