ब्रेकिंग

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

कोपरगाव : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सोनवणे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. श्रीमती बालवे, प्रा. जगझाप, कला विभाग प्रमुख प्रा. जाधव, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. जेजुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

कार्यक्रमाच्या दिवशी अध्यापनासोबतच सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी बघितले. त्यानंतर झालेल्या या कार्यक्रमाचे संचालनही विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी सोनम भडकवाडे हिने कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. यावेळी हर्षदा बागुल, अक्षदा पटाईत, साक्षी मुळे, ओंकार म्हस्के, अमन शेख, साईना कोते, स्वरा रोहमारे, संकेत कोकाटे, श्रद्धा भवर, सोनाक्षी निकम, सिद्धी जाधव, अशविरा मन्सूरी, खुशी शेख, ईश्वरी आव्हाड इत्यादी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाला अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. त्या प्राचार्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. बुधवंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांनी मांडलेल्या भावना भारावून टाकणाऱ्या आहेत. मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ठाणगे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या महान कार्याचे स्मरण केले तसेच शिक्षकांच्या देश घडवण्याचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.

जाहि
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या अनोख्या नात्यावर सादर केलेले नाटक राहिले. या नाटकाचे दिग्दर्शन वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी स्वरा रोहमारे हिने केले होते. या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सोबतच मीनाक्षी तिपायले या विद्यार्थिनीने मी सावित्रीबाई फुले बोलतेय हे एकपात्री प्रयोग सादर केला. हर्षा पंजाबी हिने आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिदा पठाण, माही वडनेरे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे