कृषीवार्ता

कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीला   राज्यस्तरीय  वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान

कोपरगांव बाजार समितीचे शिरपेचात मानाचा तुरा

कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीला   राज्यस्तरीय  वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान

    कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीला नाशिक विभागातुन मानाचा
राज्यस्तरीय तिस-या क्रमांकाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्राप्त़
मान.आमदार श्री.आशुतोषदादा काळे, मा.श्री.विवेकभैय्या कोल्हे, मा.श्री.राजेशआबा परजणे, मा.श्री.नितीनभाऊ औताडे यांच्या कुशल नेतृत्वामध्ये कोपरगांव बाजार समितीचे शिरपेचात मानाचा तुरा

 

कोपरगांव :- ता. 17                  महाराष्ट्र राज्य़ बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे यांच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट़ कामगिरी करणा-या बाजार समित्यांना मा.वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळयात नाशिक विभागातुन कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीने उत्कृष्ट़ कामगिरीचा मान पटकावत तिस-या क्रमांकाचा मानाचा मा.वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून आपल्या कार्याचा राज्य़भर ठसा उमटविला आहे. उत्कृष्ट़ कामगिरी, पारदर्शक  कारभार, शेतक-यांच्या मालाला योग्य़ भाव मिळवून देणे,  त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध़ करून देणे, सलग अ वर्ग, भरीव वाढावा, शेतक-यांना रोख पेमेंट, काँक्रीटीकरण, जनावरे, भाजीपाला, उपबाजार येथे शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा आणि शेतक-यांच्या हिताला प्राधान्य़ देणा-या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीने केलेल्या उत्कृष्ट़ कामगिरीची दखल घेवून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळयात महाराष्ट्र राज्य़ बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब नाहाटा, उपाध्यक्ष श्री.सुर्यवंशी, संचालक ॲडव्होकेट श्री.सुधीर कोठारी, श्री.मानकर तसेच महिला संचालिका यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह़ देऊन हा पुरस्कार कोपरगांव बाजार समितीला प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती मा.श्री.साहेबराव रोहोम, उपसभापती मा.श्री.गोवर्धन परजणे, सन्मा. संचालक सर्वश्री.साहेबराव लामखडे, खंडु फेपाळे, रामदास केकाण,  प्रकाशराव गोर्डे, बाळासाहेब गोर्डे, ऋषीकेश सांगळे, रेवननाथ निकम, लक्ष्मणराव शिंदे, संजयराव शिंदे, शिवाजीराव देवकर, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोकराव नवले, रामचद्र साळुंके, सौ.मिराताई कदम, सौ.माधुरीताई डांगे, यांच्यासह सचिव श्री.नानासाहेब रणशुर उपस्थित होते.

जाहिरात

 मान.आमदार आशुतोषदादा काळेसाहेब, मा.विवेकभैय्या कोल्हेसाहेब,मा.राजेशजी आबा परजणेसाहेब, मा.नितीनभाऊ औताडेसाहेब यांचे मार्गदर्शना खाली बाजार समितीचे सभापती मा.श्री.साहेबराव रोहोम व उपसभापती मा.श्री.गोवर्धन परजणे व सर्व सन्मा.संचालक हे बाजार समितीचा कारभार उत्कृष्ट़ व पारदर्शक करीत असुन मागील तीन वर्षात अनेक  उपक्रमाव्दारे बाजार समितीने आदर्श कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीने वेगळेपण सिध्द़ करून तिस-या क्रमांकांचा हा मानाचा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल सभापती श्री.साहेबराव रोहोम, उपसभापती श्री.गोवर्धन परजणे, सचिव श्री.नानासाहेब रणशुर यांनी सर्व सदस्य़, अधिकारी, कर्मचारी, खरेदीदार  व्यापारी, हमाल मापाडी वर्ग व इतर बाजार घटकांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे हे शक्य़ झाले असुन या पुरस्काराने समितीच्या कार्याला नवी उर्जा मिळाली आहे. यापुढेही बाजार समितीचे हिताचे कामे करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी तत्प़र व अधिक उपयुक्त़ व नावीण्य़पुर्ण उपक्रम राबवून सुविधा उपलब्ध़ करून देण्याचा निर्धार व्यक्त़ केला आहे.

जाहिरात
जाहिरात

हा पुरस्कार मान.आमदार श्री.आशुतोषदादा काळेसाहेब,मा.श्री.विवेकभैय्या कोल्हेसाहेब, मा.श्री.राजेशजी आबा परजणेसाहेब, मा.श्री.नितीनभाऊ औताडेसाहेब यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांची राज्य़स्तरावर दखल घेणारा ठरला असुन त्यांनी बाजार समिती संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

 

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे