जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सोमैया महाविद्यालयाचे घवघवीत यश…
जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सोमैया महाविद्यालयाचे घवघवीत यश…
कोपरगाव दि.:-सोनई फार्मसी महाविद्यालय, सोनई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले आहे. तसेच मुलांच्या संघाने देखील उपविजेतेपद मिळविले आहे. त्याच बरोबर या स्पर्धेमधून तीन विद्यार्थिनी खेळाडू व दोन विद्यार्थी खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



