एक दिवस देशासाठी, देशाच्या विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचे साक्षीदार व्हा आ.आशुतोष काळेंच्या सहकार्याने क्रिकेट रसिकांसाठी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भव्य एलईडी स्क्रीनवर
एक दिवस देशासाठी, देशाच्या विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचे साक्षीदार व्हा आ.आशुतोष काळेंच्या सहकार्याने क्रिकेट रसिकांसाठी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भव्य एलईडी स्क्रीनवर
कोपरगाव – विश्वचषक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला असून रविवार (दि.१९) रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा अंतिम सामना होणार आहे.या सामन्याचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण कोपरगावकरांना पहाण्याची सुवर्णसंधी आ.आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून देण्यात आली आहे हा अंतिम सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आ.आशुतोष काळे स्वतः उपस्थित राहणार आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहुल सेमी फायनल मध्ये न्युझीलंड संघाचा पराभव करून अंतिम फेरीत गाठली असून दुसऱ्या सेमी फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ऑस्ट्रेलिया संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार आहे.संपूर्ण देशवासीयांच्या नजरा या अतून सामन्याकडे लागल्या आहेत.या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे या सामन्याचे कोट्यावधी भारतीय व जगभरातील क्रिकेट रसिक याची देही, याची डोळा या सामन्याचा आनंद घेणार आहे. हा अंतिम सामना क्रिकेट रसिकांना एकत्रितपणे भव्य एलईडी स्क्रीनवर पाहता यावा यासाठी आ.आशुतोष काळे यांनी क्रिकेट रसिकांसाठी कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजन केले आहे. दुपारी एक वाजल्यापासून या अंतिम सामन्याचा आनंद क्रिकेट रसिकांना घेता येणार आहे.२०२३ च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असून संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाची कामगिरी पाहता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून तिसरा विश्वचषक जिंकण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाचे मनोबल वाढविण्यासाठी व क्रिकेट जगतात भारतीय क्रिकेट संघाला जगज्जेता करण्यासाठी क्रिकेट रसिकांनी या संधीचा फायदा घेवून हा अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विजयाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.


