सावळीविहीर खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन….
सावळीविहीर खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन……
सावळीविहीर/-राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 कोटी 87 लक्ष निधी उपलब्ध करून तसेच रस्ता डांबरीकरण ,पाणी पाईप लाईन विस्तारीकरण, विविध वाडी वस्ती येथील रस्ता खडीकरण, जिल्हा परिषद शाळा खोली बांधकाम, काही रस्ता काॅन्क्रीटीकरण, विविध ठिकाणी विद्युत रोहित्र बसवणे, काही रस्ता मुरमीकरण,सोलर हायमॅक्स बसवणे, पेव्हर ब्लॉक , नवीन ट्रान्सफॉर्मर , पाणी फिल्टर आरओ बसवणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम , बंदीस्त गटार बांधणे , पोल तार शिप्ट करणे,या प्रमाणे विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहे व काही कामे हि पुर्ण झाले आहे झगडे वस्ती ते बोरावके वस्ती ब्राॅचचारी येथे यांच्या रस्त्यावर मुरुमीकरण केले आहे या रस्त्याचे उद्घाटन समारंभ नुकताच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला आहे यावेळी मा.संरपच अशोकराव जमधडे,ग्रा.सदस्य महेश जमधडे,प्रभाकर बोरावके,विजय खरात ,सुधीर वर्पे , दत्तात्रय क्षीरसागर, विठ्ठल बोरावके, अरविंद बोरावके, सुधाकर बोरावके,जनार्दन जांभुळकर ,भीमा वर्पे, संजय उगले देविदास अहिरे, संतोष हिवाळे गणेश रक्ताटे ,किसन विघे आदी मान्यवर उपस्थित होते





