महाराष्ट्र

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ-आ.आशुतोष काळे

वेतनवाढीची अंमलबजावणी केल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे व व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे यांचा सत्कार करतांना कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी.

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ-आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचवर्षीय वेतनवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे.

दिवाळी सणाचे औचित्य साधत साखर कारखाना व संलग्न उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ व स्नेहभेट कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी १० टक्के वेतनवाढ लागू करण्याची दिवाळीची भेट कर्मचाऱ्यांना दिली.ज्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस दराच्या बाबतीत संवेदनशील आहे त्याप्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील तेवढाच संवेदनशील असून हि संवेदनशीलता मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यापासून जपली जात आहे.

त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या ५ वर्षाचे कालावधीसाठी सामंजस्य करार करून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी कराराची कार्यवाही व अंमलबजावणी करणेबाबत सूचित केले होते. त्याबाबत दि.१४ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने परिपत्रक प्रसिद्ध करून साखर कारखान्यांना कामगारांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. या निर्णयाचे कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत करून कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे याचे आभार मानले आहे.

जाहिरात

सहकाराची मूल्य जपणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना परिसराचा विकासरुपी रथ असून या रथाला पुढे नेणारी दोन चाके म्हणजे ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि कर्मचारी आहेत. या दोघांच्या सामूहिक प्रयत्नांशिवाय या विकासरुपी रथाचा प्रवास अशक्य आहे. सभासदांच्या घामाच्या थेंबातून ऊस उगवतो आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमातून गोड साखर तयार होते  त्यामुळे कारखान्याच्या विकासरुपी रथासाठी या दोनही घटकांचे योगदान अमूल्य असून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय म्हणजे त्यांच्या निष्ठेचा, मेहनतीचा आणि समर्पणाचा सन्मान आहे.-.आशुतोष काळे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे