महाराष्ट्र

“सोनई येथील घटनेच्या निषेधार्थ सोनई ते लोणी पदयात्रेचे आयोजन”- ॲड नितीन पोळ

 

“सोनई येथील घटनेच्या निषेधार्थ सोनई ते लोणी पदयात्रेचे आयोजन”- ॲड नितीन पोळ

सोनई येथे मातंग तरुणावर झालेल्या जातीयवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने सोनई ते लोणी पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की,सोनई तालुका राहुरी येथील समाज बांधव संजय वैरागळ याच्यावर ऐन दिवाळच्या सणाच्या धामधुमीत जीवघेणा प्राणघातक जातीय हल्ला करण्यात आला.
अहिल्या नगरचे पालक मंत्री मा राधाकृष्ण विखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खा.सुजय विखे यांनी गेल्या सहा महिन्या पासुन शिर्डी परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा चंग बांधलेला असताना सोनई येथे दुर्दैवी घटना घडल्या नंतर आरोपी अद्याप मोकाट आहेत.

या घटनेचा निषेध म्हणुन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा रामचंद्र भरांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व ॲड नितीन पोळ यांच्या नेतृत्वात येत्या *”३०/१०/२०२५ ते ३१/१०/२०२५ रोजी सोनई ते लोणी “* अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक ३०/११/२०२५ रोजी सकाळी सोनाई येथून पद यात्रा निघून गावोगावी समाज बांधवांना मानसिक आधार देण्याचे काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी अहिल्या नगरचे पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांचे लोणी येथील घरी भेटून खालील मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे
१) सोनई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी
२) पोलीस केस दाखल करून घेण्यास टाळटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे
३) अहिल्या नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित करण्यात यावा
या विषयावर लोक स्वराज्य आंदोलन व सम विचारी संघटनांच्या वातीने पद यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन जास्तीत जास्त संख्येने या पद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड नितीन पोळ
केले आहे

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे