महाराष्ट्र

अविवाहित महिला व विधवा महिलांसाठी लाडकी बहिण के वाय सी अट शिथिल करा :-सौ.सोनल चोरगे

अविवाहित महिला व विधवा महिलांसाठी लाडकी बहिण के वाय सी अट शिथिल करा :-सौ.सोनल चोरगे संस्थापक अध्यक्षा
कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव

कॊपरगाव प्रतिनिधी :-  अनेक महिला  अविवाहित आहे पण त्यांच्या वडिल ह्यात नाही किंवा मुलगी लहान असताना वडील वारलेत म्हणुन आधार कार्ड नाही किंवा अनेक महिला अशा आहेत कि जेव्हा त्यांचे पती वारलेत तेव्हा आधार कार्ड नोंदणी नव्हती, त्यामुळे  ते वारलेत म्हणुन त्यांचे आधार कार्ड नाही या कारणांमुळे अनेक महिला ह्या गरीब गरजु वंचित पिढीत आहे.
या बहिणींना लाडक्या बहिण योजनेची  गरज आहे .पण के वाय सी होत नाही.त्यामुळे के.वाय.सीची मोठी अडचण झाली आहे.त्यामुळे के.वाय.सी. ची.अट शिथील करावी असे  आशयाचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्री यांना ईमेलने सौ.सोनल चोरगे
संस्थापक अध्यक्षा
कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने पाठवण्यात आलेले आहे

जाहिरात

निवेदनात पुढे म्हंटले आहे कि सरकारने लाडक्या बहिणीला के वाय सी ची अट जी आहे ती अन्याय कारक आहे यामुळे अनेक गरजु बहिणी आज या योजने पासुन वंचित राहणार आहे . ज्या बहिणी लाडक्या पाहिजे होत्या त्यांच्यावरच खरा अन्याय होत आहे सरकार माय बाप ने असा अन्याय करू नये व ज्या अविवाहित व विधवा महिला भगिनी आहे त्यांना के वाय सी अट शिथिल करावी किंवा के वाय सी यंत्रणेत सुधारणा करावी अश्या प्रकारची विनंती कोपरगावच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या तसेच कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ.सोनल चोरगे यांनी ईमेलने निवेदन पाठवत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे