धारणगावसह जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हाण, मुर्शतपूर पाच गावांच्या पाणी योजनेच्या कामाची आ. आशुतोष काळेंनी केली पाहणी
जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान व मुर्शतपूर या पाच गावांच्या संयुक्त पाणी योजनेची पाहणी प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.
धारणगावसह जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हाण, मुर्शतपूर पाच गावांच्या पाणी योजनेच्या कामाची आ. आशुतोष काळेंनी केली पाहणी
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव तसेच जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान व मुर्शतपूर या पाच गावांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. पिण्याच्या पाण्याची हि समस्या आ.आशुतोष काळे यांनी कायमची सोडविली असून सुरु असलेल्या या पाणी योजनेच्या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली आहे.



कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना रखडलेल्या होत्या. या योजनांना आ. आशुतोष काळे यांनी चालना देवून आजपर्यंत मतदार संघातील पाणी योजनांसाठी तब्बल २७० कोटी निधी आणला असून यामध्ये धारणगावसह जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान व मुर्शतपूर या पाच गावांच्या संयुक्त पाणी योजनेसाठी २९ कोटी ६२ लक्ष निधी आणला आहे. या निधीतून पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असून या कामाची आ. आशुतोष काळे यांनी पाहणी करून देवून लवकरात लवकर नागरिकांना पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेच्या कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या.यावेळी यावेळी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब चौधरी, माजी सरपंच नानासाहेब चौधरी, येसूलाल शेख, मारुतीराव चौधरी, रामदास केकाण, बाळासाहेब पवार, हिंगणीचे सरपंच धनराज पवार, भाऊसाहेब भाबड, हरिभाऊ केकाण, निखील जाधव, गोरख चौधरी, राजेंद्र जाधव, नानासाहेब दवंगे, शिवाजी चौधरी, रघुनाथ जाधव, छबुराव थोरात, अनिल थोरात, बाजीराव रणशूर, मंगेश जिरे, मधू मोरे, मारुती रणशूर, पोपट रणशूर, मारुती थोरात, पोपट चौधरी, बाळासाहेब रणशूर, वामनराव जाधव, लक्ष्मण चौधरी, रघुनाथ मोहिते, मोहन मोहिते, बाळासाहेब चौधरी, पांडुरंग कुदळे, रामदास रणशूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी शेखर मेटकरी तसेच रविंद्र पावबाके, भारत देसाई, ग्रामसेविका श्रीमती पूनम आहिरे आदी मान्यवरांसह धारणगाव, जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान व मुर्शतपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
