महाराष्ट्र

नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी तातडीच्या मोजणीसाठी पाठपुरावा सुरु~शरद पवळे

नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी तातडीच्या मोजणीसाठी पाठपुरावा सुरु~शरद पवळे

 नगर पुणे महामार्गावरील सतत होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी उभारलेल्या लढ्याला गांभिर्याने घेत सार्वजनिक बांधकामने रस्त्यावरचे खड्डे, दुभाजक दुरुस्ती, दिशादर्शक फलकांसह शिरूर~नगर महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीसा देवून रस्त्यावरील अतिक्रमण काढले जाणार असुन नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करून महामार्ग अपघातमुक्त करावा~ शरद पवळे( सामाजिक कार्यकर्ते)

 

” चौपदरीकरणाच्या संयुक्त मोजणी फी संदर्भात उपविभागीय अभियंता नगर कार्यालयाकडून पारनेर भुमी अभिलेखला तातडीचे पत्र”

नगर~ पुणे महामार्गावरील निकृष्ट,अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे सतत होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नारायणगव्हाणसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहार करत उपोषण, रास्ता रोको , टोल बंद अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभा करत नगर पुणे महामार्गाला अपघातमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत नारायणगव्हाणच्या प्रलंबित चौपदरीकरणासह नगर~पुणे महामार्गाला सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी चालु असलेल्या कामाला गती येत असुन नगर~पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रस्तादुरुस्त्या चालु असुन नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे प्रलंबित राहिलेले 945 मीटरचे काम ग्रामस्थांच्या लढ्यामुळे 815 मीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम झाले असून गावातील अंदाजे 130 मीटरचे काम बाकी आहे त्याकरिता उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर अहमदनगर यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख पारनेर यांच्याकडे चौपदरीकरणाचे संयुक्त मोजणी फी कळविण्यात यावी यासाठी पत्र देण्यात आले असून लवकरच तातडीची मोजणी करण्यासाठी उप विभागीय अभियंता कार्यालय, बांधकाम उपविभाग अहमदनगर यांच्याकडून पाठपुरावा सुरू असुन शिरूर नगर रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर दोन्ही बाजूचे अतिक्रमण लवकरच काढले जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

जाहिरात
जाहिरात

मंगलाष्टक झाल्यानंतर  नवरदेव पोहचला वधुसह मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/Hsov-3BMNM0

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे