महाराष्ट्र

53 व्या कोपरगाव तालुका विज्ञान, गणित, कला व पर्यावरण प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात…

प्रदर्शनातील सर्व पारितोषिकप्राप्त बालवैज्ञानिक मान्यवरांसमवेत

53 व्या कोपरगाव तालुका विज्ञान, गणित, कला व पर्यावरण प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात…

कोपरगाव दिनांक:-“सर्वप्रथम आज पारितोषिक प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन. त्याचबरोबर के. जे. सोमैया महाविद्यालयाने तयार केलेल्या ए. आय. प्रयोगशाळा, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, ग्रंथालय आदी गोष्टी पाहण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळांनी आपापल्या सहली येथे आणाव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणताही खर्च न करता येथे खूप काही शिकण्यासारखे पहायला मिळेल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य दूध संघाचे माजी चेअरमन मा. राजेश परजणे यांनी येथे केले. पंचायत समिती कोपरगाव, विज्ञान, गणित, कला अध्यापक संघ व के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 53 व्या कोपरगाव तालुका विज्ञान, गणित, कला व पर्यावरण प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मा. संदीप कोळी, श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी मा. संदीप निमसे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

      याप्रसंगी मा. संदीप कोळी म्हणाले की “या प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी तयार केलेले नवनवीन प्रयोग व नेत्रदीपक कलाप्रकार मी खरोखर भारावून गेलो. विद्यार्थ्यांनी अशा नावीन्यपूर्ण प्रयोगांबरोबरच दररोज एक तास व्यायाम व खेळ खेळणे देखील आवश्यक आहे.” मा. संदीप निमसे म्हणाले की “विद्यार्थ्यांनी आता ‘हाताची घडी व तोंडावर बोट’ हा मंत्र सोडून सतत कृतिशील बनणे आवश्यक आहे, तरच तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. भविष्यात तुमच्या हाताने मला एखादी ट्रॉफी मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो. मी याप्रसंगी तुमच्या शिक्षकांसोबतच तुमच्या आई-वडिलांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

जाहिरात

      मा. संदीपराव रोहमारे म्हणाले की “कोपरगाव तालुकास्तरीय बाल वैज्ञानिकांचे हे प्रदर्शन बघून मला महान वैज्ञानिक एडिसन ची जीवनकथा आठवली. बालपणीच शाळेतून सोडचिठ्ठी मिळालेल्या एडिसनची आईच शिक्षिका बनली आणि पुढे एडिसनने विज्ञान जगतात घडवलेला चमत्कार संपूर्ण जगाला माहिती आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे एडिसन ठरावेत असा सार्थ विश्वास मला वाटतो.” प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सर्व बालवैज्ञानिकांना व शिक्षकांना आवाहन केले की त्यांनी आपापल्या शाळेची एक दिवसीय सहल घेऊन आमच्या के. जे. सोमैया महाविद्यालयातील ए. आय. प्रयोगशाळा तसेच वस्तू संग्रहालय आदी नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी द्याव्यात. तसेच महाविद्यालयाकडून प्रत्येक शाळेला 21 पुस्तकांचा एक संच भेट देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी  के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षकांच्या परिश्रमाची प्रशंसा केली.याप्रसंगी लहान व मोठे अशा प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांकाच्या पारितोषिकप्राप्त विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात तालुक्यातील सुमारे 50 विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश होता. हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. या सुरेख समारंभाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरख चव्हाण यांनी केले, तर श्री. प्रवीण निळकंठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे