महाराष्ट्र
आर.जे.एस औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन ई-क्विझ स्पर्धेचे आयोजन

आर.जे.एस औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन ई-क्विझ स्पर्धेचे आयोजन
राज्यभरातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव प्रतिनिधी :-राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन ई-क्विझ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेला सुलतानपूर, शिरपूर, नाशिक, पुणे, येवला, सासवड, मालेगाव, शेवगाव, मुंबई, जालना, मानूर, काष्टी, सोलापूर, अमरावती, आसंगाव तसेच अहिल्यानगर आदी शहरांतील विविध फार्मसी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व डी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी खुली होती.

स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून १०३४ नोंदणी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांतून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना ऑनलाईन लिंकद्वारे ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी व फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयांवरील प्रश्नांचा समावेश होता.स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दुसरी फेरी Google Meet द्वारे प्रश्नोत्तर स्वरूपात घेण्यात आली. अंतिम मूल्यमापनानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार तीन विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा अत्यंत मजेशीर, संवादात्मक व डिजिटल पद्धतीने पार पडली.स्पर्धेसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयातर्फे रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.

प्रथम पारितोषिक – रु. २००० : कु. श्रुती होळे (एस. जी. रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड)
द्वितीय पारितोषिक – रु. १५०० : कु. कोमल गिराम (आर. जे. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण)
तृतीय पारितोषिक – रु. १००० : कु. वंदना गरुड (एस.जी.रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड)या स्पर्धेसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव.प्रसादजी कातकडे, प्रसिद्ध उद्योजक विजय कडु, इंजिनीयर दीपक कोटमे, संचालक प्रणित कातकडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन व उपप्राचार्य डॉ.उषा जैन यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विजय कडु यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून उच्च पदांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही राज्यस्तरीय ई-क्विझ स्पर्धा प्राचार्य डॉ. नितीन जैन व उपप्राचार्य डॉ. उषा जैन यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे व सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे यशस्वीरीत्या पार पडली.
प्राचार्य डॉ. नितीन जैन यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षण, औषधांचा तर्कसंगत उपयोग, व्यावसायिक नीतिमूल्ये व स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यासंदर्भात मार्गदर्शन केले.ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले ज्ञान तपासण्याची व ते अधिक वृद्धिंगत करण्याची संधी मिळाली, असे डी. फार्मसी विभागप्रमुख स्मिता शेटे यांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. नितीन जैन व डॉ.उषा जैन यांनी केले.या स्पर्धेचे आयोजन डिप्लोमा विभागप्रमुख प्रा.सौ. स्मिता शेटे, प्रा. श्वेता काळे, प्रा. वैष्णवी लोखंडे, प्रा. साक्षी भोंडगे, तसेच प्रा. भारती कुचे व प्रा. सोनाली राठोड यांनी यशस्वीरीत्या केले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून
https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



