क्रिडा व मनोरंजन

सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करत अंतिम सामन्यात नगर शहराचा पराभव करून  पटकाविले अजिंक्यपद !

सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करत अंतिम सामन्यात नगर शहराचा पराभव करून  पटकाविले अजिंक्यपद !

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व अहिल्यानगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयआयोजित पुणे विभागीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा 16 व 17 जानेवारी 2026 या कालावधीत सावित्रीबाई फुले विद्यालय, राहुरी येथे पार पडल्या.या स्पर्धेत सोमैया विद्याविहार मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करत अंतिम सामन्यात नगर शहराचा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले आहे .विजयी संघ राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत संपूर्ण पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहेत. सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री संजय अमोलिक यांचे मार्गदर्शन लाभले. सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीने या शैक्षणिक वर्षात हे सातवे विजेतेपद पटकाविले आहे .संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैया सर यांची प्रेरणा ,,क्रीडा अकादमी चे प्रमुख एझाझ खान सर,आदित्य सिंग सर, स्थानिक शाळा समितीचे सेक्रेटरी मा. सुहास गोडगे साहेब,पर्यवेक्षक श्री खळदकर सर ,क्रीडा समन्वयक रोहन शिंदे सर यांचे सहकार्य या सर्व सांघिक कामगिरीमुळे हे यश विदयार्थी मिळवत आहेत.सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडी शाळेने या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा खेळावी अशी स्वर्गवासी मुख्याध्यापक श्री.धायतडक सर यांची इच्छा होती म्हणून हे अजिंक्यपद सरांना समर्पित.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे