महाराष्ट्र

समाजकारण, पत्रकारिता आणि जनसेवेचा ध्यास; भगवान दगडू थोरात यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

समाजकारण, पत्रकारिता आणि जनसेवेचा ध्यास; भगवान दगडू थोरात यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे श्री भगवान दगडू थोरात हे राहता तालुक्यासह परिसरात एक परिचित आणि सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक, पत्रकारिता आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी समाजहिताचे कार्य उभे केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्री भगवान दगडू थोरात हे मुख्य संपादक – साई युग न्यूज, संपादक – दैनिक साई युग, तसेच संपादक – दैनिक साई मंथन म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहेत. सत्य, वस्तुनिष्ठता आणि लोकहित जपत त्यांनी पत्रकारितेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच ते राहता तालुका दैनिक प्रतिनिधी – सह्याद्रीच्या राखणदार म्हणूनही कार्यरत आहेत. पत्रकारितेसोबत संघटनात्मक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते राहता तालुका अध्यक्ष – बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, माजी तालुका अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, तसेच माजी जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय पोलीस मित्र संघटना म्हणून कार्यरत राहिले आहेत.
मानवाधिकार क्षेत्रातही त्यांनी योगदान देत माजी तालुका अध्यक्ष – ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार) या पदावरून समाजातील वंचित, पीडित आणि न्यायासाठी लढणाऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी निल क्रांती तरुण मंडळाचे संस्थापक म्हणूनही कार्य उभे केले.पत्रकारिता, सामाजिक सेवा आणि संघटनात्मक नेतृत्वाचा समतोल साधत जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे भगवान दगडू थोरात यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत. त्यांच्या हातून समाजहिताची अशीच प्रेरणादायी कामगिरी पुढेही घडत राहो, हीच सदिच्छा.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे