ब्रेकिंग

मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पा. घुमरे तर उपाध्यक्षपदी एकनाथ पा. गायखे यांची निवड.

मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पा. घुमरे तर उपाध्यक्षपदी एकनाथ पा. गायखे यांची निवड.

कोपरगाव.कोपरगाव तालुक्यातील राजकीय दुष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कारभारी घुमरे तर उपाध्यक्षपदी एकनाथ बाबुराव गायखे यांची नुकतीच निवड करण्यात आली. निवडणुकनिर्णय अधिकारी म्हणुन एस.बी. क्षीरसागर यांच्या उपस्थितीत व सहकार महर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक नरहरी पा. तिरसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी शिवाजीराव पा. घुमरे यांच्या नावाची सुचना भास्करराव पा. तिरसे यांनी केली तर त्यास रामनाथ पा. भोसले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी एकनाथ पा. गायखे यांच्या नावाची सुचना संभाजीराव पा.गावंड यांनी केली तर त्यास किसनराव पा. भोसले यांनी अनुमोदन दिले. या प्रसंगी संचालक साहेबराव पा. तिरसे, संजय पा. कोकाटे, माधवराव गोसावी ,राधाकृष्ण गवळी, चंद्रकांत पगारे, श्रीमती यशोदाबाई घुमरे, सौ शितल पायमोडे मधुकरराव कोकाटे, उत्तमराव पायमोडे उपस्थित होते. अध्यक्ष शिवाजीराव घुमरे म्हणाले जिल्हा सह बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या सहकार्याने सोसायटीच्या सर्व सभासदांसाठी असणाऱ्या योजना राबवुन त्यांच्या उर्व्वषासाठी प्रयत्न करु. सचिव अण्णासाहेब निकम यांनी आभार मानले,नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संजीवनी उदयोग समुहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे