कृषीवार्ता

शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवा-आ.आशुतोष काळे

शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवा-आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- मागील वर्षी राज्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यात यंदा मका उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून कोपरगाव मतदार संघही त्याला अपवाद नाही. कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावाने मका विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतु अद्याप पर्यंत मका खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक नड पूर्ण करण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विकली असून खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी करत आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने मका उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण ओळखून शासकीय दराने मका खरेदी सुरु करून कोपरगाव तालुक्यात मका खरेदीसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जाहिरात
जाहिरात

दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की,केंद्र शासनाने मका पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली असली तरी कोपरगाव तालुक्यात एकमेव शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध असून ते तालुक्याच्या सीमेवर शेवटच्या टोकाला बहादराबाद येथे आहे व त्या ठिकाणी मका विक्री करण्यासाठी मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असली तरी त्या ठिकाणी अद्यापही मका खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात मका विकावी लागत आहे. वाढलेला उत्पादन खर्चखतांचे वाढते दरमजुरीवाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असून मका पिकाला हमीभाव न मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच खालावू शकते.  

जाहिरात

मका हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक असून पशुखाद्यउद्योग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात त्याला मोठी मागणी आहे. मात्र कोपरगाव तालुक्यात शासनाकडून थेट खरेदीची व्यवस्था असूनही खरेदी सुरु झालेली नाही त्यामुळे  खाजगी व्यापारी दर पाडून मका खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशा वेळी हमीभाव मिळाला नाहीतर पिकासाठी घेतलेल्या कर्जाची फेड कशी करायचीकुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचाअसा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात तातडीने शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करावी व शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांची संख्या वाढवून त्या मार्फत मकाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे