महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या गटनेत्या व नगरसेवकांना स्वतंत्र दालन द्या गटनेत्या सौ.गौरी पहाडेंची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

राष्ट्रवादीच्या गटनेत्या व नगरसेवकांना स्वतंत्र दालन द्या गटनेत्या सौ.गौरी पहाडेंची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कोपरगाव :- कोपरगाव नगरपरिषदेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकूण ११ व स्वीकृत ०१ असे एकूण १२ नगरसेवक निवडून आलेले आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या कामकाज संदर्भात व कोपरगाव शहराच्या विकासाबाबत विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात गटनेते व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका सौ. गौरी  पहाडे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

जाहिरात

दिलेल्या पत्रात सौ. गौरी  पहाडे यांनी असे म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या दररोजचे कामकाज तसेच कोपरगांव शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक नियमितपणे कोपरगाव पालिके उपस्थित राहणार आहे. तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व प्रत्येक प्रभागातील होणाऱ्या विकास कामांची माहिती नागरीकांना सविस्तरपणे देवून त्यांच्या सर्व तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे.

जाहिरात
जाहिरात

त्यासाठी गटनेत्या व  सर्व नगरसेवकांना स्वतंत्र दालनाची आवश्यकता आहे. त्यासाठी  कोपरगांव नगरपरिषद कार्यालयात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देवून सहकार्य करावे असे सौ.गौरी पहाडे यांनी शेवटी म्हटले आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे