महाराष्ट्र

चांगदेवनगर पोस्ट अॉफिसचे स्थलांतर रोखणारच .पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी

चांगदेवनगर पोस्ट अॉफिसचे स्थलांतर रोखणारच .पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.
पुणतांबा :- पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चांगदेवनगर येथील पोस्ट अॉफिसचे स्थलांतर होऊ नये म्हणून  पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी याचे नेतृत्वाखाली  चांगदेवनगर येथे स्थलांतर विषयी कारवाई करण्यासाठी आलेले श्रीरामपूर येथील अधिकारी हरदल साहेब यांना घेराव घालून प्रथम विनंती करुन पोस्ट अॉफिसचे स्थलांतर झाले नंतर येणाऱ्या अडीअडचणी बाबद नागरीकांची होणारी ससेहोलपट याची सविस्तर माहिती देत शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले की हे स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाचे वतीने खा वाकचौरे यांना निवेदन दिले आहे व त्यांनी संबंधित शिष्टमंडळाला या विषयावर निश्चित रहा असे सांगून आश्वासित केले आहे. पुणतांबा.चांगदेवनगर.जळगाव .रामपुरवाडी.येलमवाडी.
श्रीरामपुररोड.गवळीबाबा फाटा.येथील वयोवृध्द लाभधारकांची होणारी अडचण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समजावुन सांगीतले असता.त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या जि आर प्रमाणे काम करणार आम्हाला वरीष्ठ अधिकारी यांचे लेखी आदेश आहे. यानंतर शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी पोस्ट अॉफिस स्थलांतर करु नये म्हणून खा वाकचौरे साहेब यांना संपर्क साधुन त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली यावर खासदार वाकचौरे यांनी संबंधित अधिकारी हरदल यांचे बरोबर बोलणे केले असता मी पुणे हेड ऑफिस ला या संदर्भात बोललो आहे तसेच हा प्रश्न फक्त चांगदेवनगरचा नसुन शिर्डी लोकसभा मतदारसंघातील बारा पोस्ट अॉफिस चा आहे मी येत्या अठ्ठाविस तारखेला लोकसभे मध्ये या विषयावर लक्षवेधी मागणी करत असल्याचे सांगितले असता संबंधित अधिकारी यांनी आमची काही हरकत नाही .

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

आम्ही आमच्या जिआर प्रमाणे काम करत आहे असे सांगितले. परंतु त्यांनंतर संबंधित विभागाने स्थलांतरा बाबदचा आढावा घेत असताना शहरप्रमुख कुलकर्णी यांनी अधिकारी यांना अंदाजे २००/३०० ग्रामस्थांचे वतीने संताप व्यक्त करुन घेराव घालून आम्ही यासाठी जन आंदोलन उभे करु असे सांगून घोषणा देत परीसर दणानुन सोडला यावेळी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी सामाजिक नेते दादा सांबारे.विलास पेटकर. सोपानराव शिंदे सर. चांगदेवनगर शिवसेना उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर नन्नवरे. संदिप गुंजाळ. खैरी निमगाव चे युवक नेते पप्पु पवार. पाटील साहेब.विलास टिळेकर भाऊ.मोसिन शेख.सुरेश पेटकर ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनिता भोरकडे .सार्थक भोरकडे.राजु बोरडे. यांचे सह असंख्य ग्रामस्थ वृध्द महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकुन टिका करत केंद्र सरकारच्या पुर्वी पासुन चे सोईसुविधा आर्थिक उत्पन्नाचा निकष लावून बंद करत आहे. पुणतांबा हे आशिया खंडातील तिर्थक्षेत्रापैकी एक दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते येथे इंग्रज राजवटीत व भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्र सरकारच्या टपाल सेवा पोस्ट अॉफिस.सेट्रल रेल्वे या सारख्या सोईसुविधा सुरू करुन त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहचविला या सोईसुविधा सुरू ठेवल्या पंरतु मोदी सरकार हे व्यापारी तत्वाचे निकष लावून या सेवा बंद करत आहे.याचा सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे . केंद्र सरकारच्या वतीने नविन कुठल्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध होत नाही परंतु ज्या आहेत त्या बंद करण्यात येत आहे . गेली १०० वर्षाच्या काळात पुणतांबा रेल्वे स्टेशन वर मोठ्या प्रमाणावर सर्व गाड्यांना थांबा होता .त्याचा लाभ अनेक भाविक भक्त व इतर प्रवासी.व्यापारी .शालेय.कॉलेज युवक युवती याचा लाभ घेत होते.परंतु केंद्र सरकारच्या धोरणानुसार या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या याचा फटका पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर बसत होता . यासाठी सर्व पक्षीय नेते.पदाधिकारी . कार्यकर्ते व तमाम जनतेच्या वतीने १५ अॉगस्ट रोजी पुणतांबा येथे रेलरोको आंदोलन करुन या विषयावर केंद्र सरकारचे लक्ष वेधुन २/४ गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. असे सांगून हे पोस्ट अॉफिस स्थलांतर झाले तर वयोवृध्द जेष्ठ नागरिक . महिला माता. भगिनी. शालेय.कॉलेज .युवक युवती यांचेवर मोठा अन्याय होणारा असुन पोस्ट अॉफिस स्थलांतर होऊ नये म्हणून यासाठी चांगदेवनगर सह पंचक्रोशीतील सर्व पक्षीय. वयोवृध्द माता भगिनी.बंधु ग्रामस्थ यांच्या वतीने धरणे आंदोलन उभे करून न्याय मागु असे शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे