महाराष्ट्र

के. जे. सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न

के. जे. सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न

कोपरगाव : स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग, सामाजिक शास्र मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 ते 30 जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय  के.बी.रोहमारे स्मृति-व्याख्यानमाला संपन्न झाल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी दिली. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांचे स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी राज्यशास्त्र विभाग व सामाजिक शास्त्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. सदर व्याख्यानमालेचे हे दहावे वर्ष असून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे हे होते. यावर्षीच्या व्याख्यानमालेत मुंबई येथील आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक मा. डॉ. अविनाश कोल्हे. भाषाशास्त्रज्ञ साहित्यिक,पत्रकार, प्रकाशक आणि सुप्रसिद्ध वक्ते डॉ. हेमंत सामंत तसेच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  संलग्नित महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनील पिंपळे यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले. व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी महाविद्यालयात वर्षभर राबविण्यात येणार्‍या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची सखोल माहिती दिली. असे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अद्यावत माहिती पोहचविण्यासाठी महत्त्वाचा सेतू असल्याचे त्यांनी म्हटले. या व्याख्यानमालेचे समन्वयक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुरेश देवरे यांनी पाहुण्यांचा परिचय व व्याख्यानमालेची भूमिका विशद केली. सह-समन्वयक डॉ. महारुद्र खोसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. परीक्षित जाधव, प्रा.दिलीप बागुल, प्रा.आदित्य देशमुख, प्रा. दिनेश घुगे, प्रा.प्रवीण मोरे व प्रा. बंद्रे यांनी व्याख्यानमालेचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे