महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांचा पालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा

 

सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांचा पालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा

 विविध मागण्या दि २८/१०/२०२३ पर्यंत मान्य न झाल्यास दि ३०/१०/२०२३वार सोमवार पासून कोपरगाव नगरपालिकेच्या गेट जवळ बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे

 

कोपरगाव प्रतिनिधी :-छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्याचे झालेले निकृष्ठ दर्जाचे काम ,त्या बाबत समाधान कारक उत्तर मिळालेले नाही ,त्याची संपूर्ण चौकशी व्हावी,आदिनाथ सोसायटी मधील गटार आणि रस्त्याची कामे त्वरित सुरू करावी
द्वारकानगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम त्वरित सुरू करणे, गोकुळ नगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम सुरू करणे,अयोध्या नगरी भागातील रस्ते व गटारचे कामे सुरू करणे,सह्याद्री कॉलोनी तील रस्ते व गटारची कामे त्वरित सुरू करणे,ब्रिजलाल नगर भागातील सी डी वर्क सह गटार बांधणे,रस्ते, सबर नगर चा रस्ता डांबरीकरण करणे,गवारे नगर, वस्ती येथील रस्ते व गटार करणे,शंकर नगर मागील पवार वस्ती भागातील रस्ते व गटारबांधकाम सुरू करणे, आढाव वस्ती मदरसा शेजारील रस्ता व गटार करणे,कर्मवीर नगर येथील गटारी व अंतर्गत रस्ते करणे ही सर्व कामे त्वरित सुरू करावी  गेल्या अनेक वर्षांपासून ह्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा   सामाजिक कार्यकर्ते निसार शेेेख करत आहे.अनेकवेळा काम सुरू करण्याचे आश्वासन दिले जाते मात्र प्रत्येक्षात सुरू होत नाही वारंवार निवेदन देऊन,समक्ष मा मुख्याधिकारी यांना भेटून चर्चा करून त्यांनी तीन महिन्यांपूर्वी आम्हाला अश्वासित केले होते की निकृष्ट रस्त्या बाबत मी बांधकाम अभियंता व संबंधित ठेकेदार, इंजिनिअर यांची बैठक करून देतो परंतु शंकेचे कोणतेही निरासरण न झाल्याने नाईलाजास्तव आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय मी घेत आहे कोट्यवधीचा निधी पडला आहे तरीही कामे होत नाही याचा अर्थ पालिका प्रशासनाचे नियोजन शून्य आहे का? कामे सुरू करून ती पूर्ण करून घेण्यात कोपरगाव नगरपालिका अपयशी ठरताना दिसत आहे ,अनेक नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांना आंदोलन उपोषण करावे लागते तेंव्हा पालिकेला जाग येते ही बाब अतिशय दुर्दैवी आहे प्रशासक राज म्हणजे मुख्याधिकारी हे शहराचे बॉस म्हणून काम पाहतात,कोणतेही ठराव न घेता निर्णय घेण्याचे सर्व अधिकार त्यांना असतात . त्यामुळे वरील कामे त्वरित करावेत अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे