महाराष्ट्र

कोपरगाव नगरपरिषदेची स्थायी समिती बैठक संपन्न

कोपरगाव नगरपरिषदेची स्थायी समिती बैठक संपन्न
अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये लोकोपयोगी व जनकल्याणकारी तरतुदींना प्राधान्य
कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत नगरपरिषदेच्या आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास स्थायी समितीची मंजुरी देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासास चालना देणारा, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पराग संधान यांनी विश्वासनाम्यात असलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने ठोस धोरण या अर्थसंकल्पात स्वीकारण्यात आले आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि शहर सुशोभीकरण या क्षेत्रांमध्ये भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात
नगरपालिका शाळांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पूर्वी असलेली ५० लाख रुपयांची तरतूद वाढवून थेट १ कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शालेय इमारत दुरुस्ती, आवश्यक शैक्षणिक साहित्य व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांच्या उभारणीसाठीही १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अकस्मिक रोगराई व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद, तर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजनांसाठी १२ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. स्वच्छता विभागासाठी वाहन खरेदी ८० लाख रुपयांची तरतूद करून शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.याशिवाय बगीच्यांची सुधारणा व नवीन उद्यानांच्या निर्मितीसाठी देखील या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना विरंगुळ्याच्या व आरोग्यदायी वातावरणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.या बैठकीस मुख्याधिकारी सुहास जगताप, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, स्थायी समिती सदस्य विद्याताई सोनवणे, प्रसाद आढाव, आरोग्य सभापती वैभव आढाव, पाणीपुरवठा सभापती वैशालीताई वाजे, जनार्दन कदम, बांधकाम सभापती निलोफरभाभी पठाण, शिक्षण सभापती संजनाताई उदावंत तसेच महिला व बालकल्याण सभापती सविताताई मंजुळ आदी मान्यवर उपस्थित होते.हा अर्थसंकल्प कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे