महाराष्ट्र

कर्मवीरांचे विचार जपणाऱ्या स्व. अजितदादांची रयत परीवाराला पदोपदी आठवण येत राहील-आ.आशुतोष काळे

कर्मवीरांचे विचार जपणाऱ्या स्व. अजितदादांची रयत परीवाराला पदोपदी आठवण येत राहील-आ.आशुतोष काळे

कोपरगाव- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा बहुजनांच्या शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा विचार अजितदादांनी आपल्या कार्यातून जपला. ज्या ज्यावेळी शासन दरबारी रयत शिक्षण संस्थेला अडचणी आल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी स्व.अजितदादांचा मोठा हातभार लागला आहे.त्यामुळे रयत परीवाराला स्व.दादांची पदोपदी आठवण येत राहील अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजितदादा पवार यांना मंगळवार (दि.०३) रोजी श्रद्धांजली वाहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्यानगर शहरातील उत्तर विभागीय कार्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

जाहिरात
जाहिरात

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सांगितले कि, सामान्य माणूस हा स्व.अजितदादांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास होता. सत्ता येते आणि जाते, पण माणसाच्या मनात निर्माण केलेली आपुलकी, विश्वास आणि आधार कायम राहतो हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. स्व.दादांनी रयतच्या अनेक शाखांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन दुरदृश्य प्रणालीद्वारे, तसेच उपाध्यक्ष अरुण कडू, मा.आ.बबनराव पाचपुते,मा.आ.दादाभाऊ कळमकर, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, विभागीय अधिकारी, सहविभागीय अधिकारी, उत्तर विभागाचे सर्व शाखा प्रमुख, रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे