




रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल च्या वतीने कोपरगाव बस स्थानकात मतदार जनजागृती अभियान”
भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे लोकशाहीमध्ये निवडणुका देखील महत्त्वाच्या असतात निवडणुकीचा आत्मा म्हणजे मतदार होय कोपरगाव शहरातील बस स्थानक येथे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल यांच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात सामाजिक कामात अग्रेसर असलेले रोटरी क्लब चा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी मतदार राजा मतदान करून लोकशाही बळकट करत असतो म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल च्या वतीने आज “कोपरगाव बस स्थानक” या ठिकाणी मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. उपस्थित प्रवासी बंधू भगिनींमध्ये मतदाना विषयी जनजागृती करण्यात आली तसेच भित्तीपत्रक चिकटवण्यात आले.या प्रसंगी कोपरगाव बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक . गिरीश खेमनर साहेब व त्यांचे सहकारी,चालक, वाहक तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष राकेश काले, मा. अध्यक्ष रोहित वाघ व प्रवासी बंधू भगिनी उपस्थित होते.









